33 वर्षाच्या प्रदीर्घ प्रामाणिक सेवेनंतर करमाळा एस् टी आगाराचे वाहक श्री संजय हांडे सेवानिवृत्त

करमाळा प्रतिनिधी
श्री हांडे हे 16/04/1989 ला करमाळा आगार एसटी डेपो मध्ये वाहक या पदावरती नियुक्त झाले, यानंतर त्यांनी 33 वर्षे एसटीमध्ये निष्कलंक नोकरी केली ,त्यांनी एसटीमध्ये ड्युटी करत असताना विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले एसटी मध्ये प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी 2000 ते 2003 तब्ब्ल् 3 वर्ष त्यांनी करमाळा आगारामध्ये व्हिडिओ सेवा बस सुरुवात केली ,या सेवेचा प्रवाशांनी प्रचंड लाभ घेतला, त्यामुळे एसटीच्या प्रवाशामध्ये सातत्याने वाढ होत गेली 33 वर्षाच्या सेवे मध्ये आज पर्यंत कधीही चिरीमिरी साठी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली नाही, अतिशय शिस्तबद्ध व इमानदारने‌‌ त्यांनी एसटीमध्ये वाहक या पदावर काम केले, त्याचबरोबर ग्राहक मंच व अंधश्रद्धा निर्मूलन समिती यामध्ये ते गेले 27 वर्षापासून काम करत आहेत, करमाळा एसटी आगारातील बरेचसे चालक वाहक सह कर्मचाऱ्यांना त्यांनी व्यसनमुक्तीचे धडे दिले,पूर्वीपासून सुपारीचे खांड हि न खाणारे असे श्री हंडे आजही निर्व्यसनी आहेत ,त्यांचे घरी आज सुद्धा चहा केला जात नाही, घरामध्ये येणारा मित्रपरिवार किंवा पाहुण्यांना चहा ऐवजी शरबत दिला जातो, त्यांच्या म्हनन्यानुसार चहा सुद्धा एक व्यसनच आहे, कित्येक चालक वाहकांची त्यांनी तंबाखू या घातक व्यसनापासून मुक्ती केली, गेले ते 33 वर्षे निस्वार्थी निष्कलंक आणि प्रामाणिक सेवा करणारे असे हांडे कंडक्टर करमाळा डेपो मध्ये विशेष सर्वांच्याच ओळखीत आहेत व आजही त्यांची तेवढी स्वच्छ प्रतिमा आहे, रिटायरमेंट नंतर ते सामाजिक कार्यामध्ये जसे पूर्वी सक्रिय होते त्यापेक्षा अधिक सक्रिय होऊन समाजातील भरकटत चाललेल्या नवीन पिढीला तरुणाईला ते व्यसनमुक्तीचे धडे देणार आहेत, व व्यसनमुक्त करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत,

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

10 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

1 day ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

1 day ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago