श्री मकाईचा ऊस दर जाहीर;२०२२- २३ या गाळप हंगामात २५०१ रुपये अंतिम दर दिला जाणार –  चेअरमन दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला आहे. यावर्षी म्हणजे २०२२- २३ या गाळप हंगामात २५०१ रुपये अंतिम दर दिला जाणार आहे असे मत  मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व सर्व संबंधितांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वानी सहकार्य करून कामाला लागावे.
श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय प्रिन्स बागल यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूकदारांची बैठक संप्पन झाली.या बैठकीस  संचालक बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके,बापु कदम, कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे, शेतकी अधिकारी शिवाजी कदम आदीजण उपस्थित होते. यावेळी वाहतूकदारांनी अनेक प्रश्न केले. कारखान्याचे काही अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. तेव्हा बागल यांनी ऊस दर जाहीर केला आहे.                                     या गाळप हंगामात ऊसाचा अंतिम दर २५०१ असणार आहे. त्यामध्ये पहिला हप्ता २३०१, दुसरा १०० व अंतिम १०० असा २५०१ दर दिला जाणार आहे.करमाळा तालुकयातील मकाईने यावर्षी पहिल्यांदाच दर जाहीर केला आहे. आता इतर कारखाने काय दर जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago