व अनेक देशातून व्हिडिओ द्वारे शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.यावेळी तानाजी भाऊबाबत बोलताना छत्रपती युवराज शहाजीराजे भोसले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर निवडक मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले त्याच पद्धतीने तानाजी भाऊनी छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श बाळगून समाजाच्या कल्याणासाठी टायगर ग्रुपची स्थापना करून महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशभर युवकांची मोठी फळी निर्माण केली असुन जनकल्याणाचे काम करणाऱ्या डाॅ. तानाजी भाऊ जाधव यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे .करमाळ्यासारखे एका ग्रामीण शहरांमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले तानाजी भाऊ जाधव यांची टायगर ग्रुप संघटना राज्यात नव्हे तर देशपातळीवर तिचा नावलौकिक असून एक युवक निस्वार्थी भावनेने कुणाचाही पाठबळ नसताना शून्यातून विश्व निर्माण करतो याचा इतिहास नक्कीच साक्षीदार होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचांराचा वारसा जपुन डाॅ .तानाजी भाऊ जाधव हे काम करत असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन कार्यरत असल्यामुळे त्यांच्या कार्यास आमचा सदैव पाठिंबा आहे. टायगर ग्रुपच्या वतीने आपल्या लाडक्या टायगरचा वाढदिवस एक आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमास महाराष्ट्रासह देशपातळीवर अनेक कार्यकर्त्याचा मोठा जनसमुदाय लाखोच्या संख्येने उपस्थित असतो. टायगर ग्रुप चे संस्थापक तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसा अभिष्टचिंतन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावून त्यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले,चांडाळ चौकडीची वेबसिरीजच्या टिमनी बाळासाहेब,रामभाऊ छोट्या या कलाकारांनी उपस्थित राहुन तानाजीभाऊना आपल्या अनोख्या गावरान शैलीत शुभेच्छा दिल्या या अभिष्ठचिंतन सोहळयाला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होतै. यावेळी तानाजी भाऊ जाधव मित्र मंडळ संयोजक करमाळा याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठया दिमाखात संपन्न झाला. करमाळा शहरात न भूतो न भविष्यती अशी नयनरम्य फटाक्याची आतिष बाजी करण्यात आली होती.या सोहळ्यामध्ये राजकारणविरहित आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी महाराष्ट्र बरोबरच देशभरातून आणि कार्यकर्त्याची मोठा समुदाय एकत्र आला होता बंगलोर, तामिळनाडू , मध्यप्रदेश , गुजरात, राज्यस्तान , उत्तर प्रदेश , पंजाब , हैदराबाद , कर्नाटक , येथील कार्यकर्त देखिल मोठ्या संख्येने उपस्थित होते तानाजी भाऊनी अनेक युवकांच्या मनावर अधिराज्य केले असुन त्याचा प्रत्यय करमाळा तालुक्याला आला आहे. डाॅ तानाजी भाऊ जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र बरोबरच देशभरातील अनेक राज्यात रक्तदान शिबिर मुठभर धान्य अभियान गोरगरिबांना कपडे वाटप विद्यार्थ्यांसाठी गणवेश वह्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याबरोबरच आरोग्याचा जागर म्हणुन आरोग्य शिबिर घेण्यात आले असून करमाळा शहरातील एक हजार लोकांना मुळव्याध तपासणी ऑपरेशनची मोफत सुविधा देण्यात आली असून जाधव पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर रोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले असून डॉक्टर प्रदीप तुपरे यांनी या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे डाॅ तानाजी भाऊ जाधव यांनी सामाजिक कार्यातून आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात उमटवला असून तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोटलेला जनसागर ही त्यांच्या सत्कार्याची पोचपावती आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…