व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी राजा माने यांची निवड**पत्रकारांची चळवळ उभारु!**राजा माने यांचा संकल्प*

 


मुंबई (प्रतिनिधी):* ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. संपादक, लेखक, संघटक अशा अनेक भूमिकांतून गेलेल्या माने यांनी अनेक संघटनांमध्येही काम केले आहे. माने यांच्या निवडीने त्यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या माध्यमातून राज्यभर पत्रकारिता, आणि पत्रकारांसाठीची चळवळ उभारू, असे मत राजा माने यांनी यावेळी व्यक्त केले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ ही संघटना देशातल्या २१ राज्यांमध्ये कार्यरत आहे. पत्रकारांच्या, आणि पत्रकारितेच्या हितासाठी लढणाऱ्या या संघटनेत महाराष्ट्र राज्याची जबाबदारी माने यांच्याकडे देण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ चे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ या संघटनेचे संस्थापक, तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, संघटनेचे संचालक तथा विधीज्ञ अॅड. समाधान काशीद यांच्या हस्ते माने यांना पत्र देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. येत्या चार दिवसांत माने हे राज्याची कार्यकारिणीही घोषित करणार आहेत. निवडीनंतर बोलताना माने म्हणाले, आपल्या महाराष्ट्र राज्याला पत्रकार आणि पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. पत्रकारिता एक मिशन, चळवळ म्हणून येथे केली जाते. या पत्रकारितेच्या चळवळीची चाके अजून गतिमान व्हावीत यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चा झेंडा खांद्यावर घेऊन माझा प्रवास सुरू असेल. ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ च्या माध्यमातून देशभरातील पत्रकारांसाठी जी ध्येयधोरणे हाती घेतली आहेत. त्यांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यातही होईल, असेही यावेळी माने म्हणाले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया‘ च्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

2 hours ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

2 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

8 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

1 day ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago