Categories: करमाळा

घरतवाडी गाव निघाले विक्रीला: निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यामुळे सर्वच निवडणुकावर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

 

 

करमाळा:  प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून करमाळा तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घरत वाडी या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. अनेक मागण्यांवरही असंवेदनशील प्रशासन व लोकप्रतिनिधीना घाम फुटला नाही. त्यामुळे चक्क घरतवाडी गावच त्यांनी विक्रीला काढले असुन सर्व निवडणूकावर सामुहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्वीच्या काळी घरतवाडीला जाणारा रस्ता दगडी असल्याने येथील ग्रामस्थांनी डांबरीकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली.मात्र कोणीहि लोकप्रतिनिधी वा प्रशासकीय यंत्रणेने याकडे लक्ष दिले नसल्याने येत्या काळात गावच विक्रीला काढण्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे जागोजागी घरतवाडी कुभारंगाव, करमाळा येथे घरतवाडी गाव विक्रीला काढल्याचे फलक सर्वत्र लावल्याचे दिसत आहेत. आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींच्या नाकर्त्यापणामुळे साधारण साडेचारशे लोकसंख्या असलेल्या या गावांमध्ये जाण्यासाठी अवघ्या दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता असून उर्वरित रुंदीकरण सहित डांबरीकरण काम प्रशासनाला देता आलेला नाही. केवळ 2015 -16 मध्ये एकदाच खडीकरण व अवघ्या १ कि मी चे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण झालेले आहे. मात्र यानंतर कुठल्याही लोकप्रतिनिधीनी अथवा प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावर सातत्याने चिखल, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. टाकलेली खडी ही सर्वत्र पसरलेने डाबंरी रस्ता की रस्त्यावर खडी रस्ता असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे या नित्कृष्ट रस्त्यावर पायी चालणे ग्रामस्थांना मुश्किल झाले आहे. अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ लोकांना कुभारंगाव या गावात यावे लागते. एसटी किंवा इतर वाहतूक घरतवाडीत येण्याचा प्रश्नच उदभवत नाही. नागरिकांना, वृद्धाना तसेच विद्यार्थ्यांना कुंभार गावात शाळेत येण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यांच्या तारेवरच्या कसरतीकडे पाहुनही प्रशासनाला कधीच घाम फुटत नाही. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सातत्याने त्यामुळे दुर्लक्षित राहिलेला आहे. घरतवाडीमध्ये आचानक उदभवलेल्या आरोग्याच्या समस्या निवारण्यासाठी करमाळा अथवा बारामती कडे धाव घ्यावी लागते. मात्र केवळ नादुरुस्त रस्त्या अभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांना तर आधीच महिना दोन महिने गाव सोडून बाहेर ठेवावे लागते. वृद्ध, महिला , विद्यार्थी व मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे घरतवाडी येथील ग्रामस्थांनी व युवकानी पुढाकार घेत राजकारण सोडून सरळ घरतवाडी गाव विक्रीला काढलेले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत अथवा प्रशासन काहीच करत नाही.त्यांची मागणी हवेतच विरत आहे. त्यामुळे सर्व सुविधा पासून घरतवाडीही नेहमीच वंचित राहिलेली आहे. आता या प्राथमिक सुविधांमध्ये जोपर्यंत रस्ता व्यवस्थित होत नाही. तोपर्यंत ग्रामस्थांनी घरतवाडी गावच विक्रीला काढले आहे .सर्वपक्षीय युवक कार्यकर्ते राजकारण, जातपात सोडून एकत्र आल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याआधीही रस्ते विकासासाठी ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले आहेत. जो पर्यंत डांबरी रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व सोयी सुविधा व येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा यांच्यासह अगदी सोसायटीच्या निवडणुका वरही बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. आता तरी प्रशासनाने घरतवडी गावाला केवळ रस्ताच नव्हे तर शासनाच्या सर्व सुविधा घरत वाडी गावापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

चौकट
आम्हा गावकऱ्यांचा कोणाला विरोध नाही. आम्ही कोणालाही दोष देत नाही.रस्त्याचा विकास होणे साठी सर्व गावकरी एका छताखाली आलो आहोत. आम्ही एकजूट केली असून जोवर डांबरीकरण रस्ता होत नाही तोवर शासकीय यंत्रणेवर बहिष्काराचा निर्णय गावकऱ्यानी बैठकीत घेतला आहे.
लोक प्रतिनिधींच्या दूरदृष्टीचा अभाव आणि निष्क्रिय शासन यंत्रणा यामुळे विकास खुंटला आहे. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत सहभागी न होण्याचा निश्चय घेण्यात आला आहे. फोल आश्वासन अनेक देण्यात आली आहेत.पण उपयोग झाला नाही.त्यामुळे अगोदर रस्ता मग शासन प्रक्रियेत सहभाग असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे .
..अनिकेत गायकवाड, घरतवाडी, ता.करमाळा.

*निवडणुकावर बहिष्कार घालण्यासाठी ग्रामस्थ, युवक एकत्र आलेले आहेत. जागोजागी लावलेले गाव विक्रीस काढल्याचे फलक खडी पसरलेला रस्ता

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

22 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago