प्रतिनिधी वाशिंबे.(सुयोग झोळ)
वाशिंबे ता.करमाळा येथील प्रयोगशील युवा शेतकरी अभिजीत राजाभाऊ पाटील व कुटुंबियांना कृषि व कृषी सलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल शेतकरी पुत्र फाऊंडेशन अहमदनगर यांच्या वतीने नँशनल ग्रेट अँचिवर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हाँटेल रेडीयन्स अहमदनगर येथील संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार,बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले.पुरस्काराचे स्वरुप , प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह असे होते अभिजीत पाटील यांनी शेतात ड्रॅगन फृट,सफरचंद,येलंकी केळी,लाल केळी,तैवान पिंक पेरु,सिताफळ,शेवगा असे नवनवीन प्रयोग करत भरघोस उत्पन्न घेतलेले आहे. योग्य व्यवस्थापन व कमी कालावधीत भरघोस उत्पादन यामुळे पाटील यांची शेती परिसरातील शेतकर्याना मार्गदर्शनपर ठरत आहे. आपल्या शेतात माहिती साठी आलेल्या शेतकर्याना आवर्जून पिकातील बारकावे सांगत असतात.या सन्मानाबद्दल पाटील यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…