रावगाव प्रतिनिधी पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव ता.करमाळा जि सोलापूर या विद्यालयात गेली 23 वर्ष सेवा बजावत असलेले सहशिक्षक प्रताप रंगनाथ बरडे यांना “वर्थ वेलनेस फाऊंडेशन यांच्या वतिने सन 2022 चा राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार जाहीर झाला आहे
त्यानी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, आरोग्य या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
नव्वी दिल्ली येथे 15 डिसेंबर 2022 रोजी होणा-या भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानी आजपर्यंत
शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवव्त्ती परिक्षेत 60 विद्यार्थी पात्र झालेले आहेत. व चालू वर्षी 3 विद्यार्थी या शिष्यव्रत्ती साठी पात्र झालेले आहेत. आसे एकूण 63 विद्यार्थी आजपर्यंत पात्र झालेले आहेत. एका विद्यार्थी प्रति महिना 1000 रूपये प्रमाणे चार वर्षे ही शिष्यव्रत्ती मिळते. त्याप्रमाणे एका विद्यार्थ्यास चार वर्षे यांचे एकूण 48000 हजार रूपये शिष्यव्रत्ती मिळते. तसेच कोरोना काळातील काम अतिशय चांगले केले आहे . विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यानी विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सहभागी होऊन शिकविले आहे. तसेच पारावरील शाळा, झाडाखालील शाळा, असे अनेक वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले. शाळेच्या क्रीडांगणावर गावातील रस्त्याच्या दुतर्फा ,पडिक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर देशी वृक्षांची लागवड केलीआहे. तसेच लोक वर्गणीतून अनेक समाजहितपयोगी कामे ,पाणीटंचाई कालावधीत पिण्याचा पाण्याचा टॅकर असी लोक हितउपयोगी कामे केली आहेत. तसेच कोरोना काळातील लोकांना प्रत्यक्ष भेटून माहिती देणे, कोरोना लस नाव नोंदणी करणे, लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून सांगणे लसघेण्यासभाग पाडणे. कोरोना लसीकरण शिबीर आयोजन करणे. कोरोना काळातील ऑनलाईन कामकाज अतिशय उत्कृष्टपणे हाताळलेले आहे.
ग्रामीण भागात मुलांना शैक्षणिक मदत करणे, शैक्षणिक साहित्य, शालेय फी, गणवेश आदि पुरविण्यात आले आहेत, सर्व सामान्य व गोरगरीब पालकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यांची काळजी घेऊन आनेक मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत,तसेच आनेक प्रकारचे खेळाडू तयार करणे व त्यांना मार्गदर्शन केले आहे. यामुळे त्याचे विद्यार्थ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत विजेते झालेले आहेत,
आज पय॔त त्यांना तालुका पातळीवर आदश॔ शिक्षक, तसेच जिल्हा पातळीवर आदश॔ शिक्षक व राज्य स्तरीय आदश॔ शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.
त्याच्या या कार्याची दखल घेऊन वर्थ वेलनेश फाऊंडेशन नवि दिल्ली, संस्थापक अध्यक्ष मानसी वाजपेयी व सह संस्थापक सोमय्या वाजपेयी यांनी दिल्ली येथे त्याच्या पुरस्काराची घोषणा केली आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याने संस्थेचे अध्यक्ष काकडे साहेब, सचिव भैय्यासाहेब काकडे, तसेच रावगांव चे सरपंच दादासाहेब जाधव, उपसरपंच विण्णू गरजे ,व राजीव गांधी वाचनालयाचे सचिव भास्कर पवार संस्थेचे मुख्याध्यापक कोळेकर सर व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,रावगावकर ग्रामस्थ व मिञ आप्तेष्ट यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…