डिकसळ पुल राज्य सरकारने स्थगिती उठविली -आमदार.संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
सन 2021 – 22 या अर्थसंकल्पात जिल्हा हद्द – कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा 3 या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी( डिकसळ पुल ) 55 कोटी रु निधी मंजूर झालेला होता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेल्या सर्वच कामावरती दि.23 जुलै रोजी च्या पत्राद्वारे स्थगिती दिली होती. त्यामुळे डिकसळ पुलाचे काम स्थगित केलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक 11 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकानुसार सदर डिकसळ पुलाच्या कामावर बसविलेली स्थगिती उठविली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. सदर पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आपण आग्रही असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्हा या सर्वांच्या दृष्टीने डिकसळ पुल हा दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याची माहिती ही आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी दिली.
करमाळा विधानसभा मतदारसंघातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रमुख जिल्हा मार्ग 190 असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका यांना जोडणारा डिकसळ पुल आहे .त्यामुळे सदर पुलाचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे. या पुलाचे काम झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थी , रुग्ण यांना रहदारीचे दृष्टीने सोयीचे होईल. सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्हा यांना दळणवळणाच्या दृष्टीने डिकसळ पुल हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

2 hours ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

5 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

1 day ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

2 days ago