ज्युनियर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना प्रभावी कामगिरी करुन वैष्णवी पाटील हिने सुवर्णपदके मिळवुन उंचावले करमाळयाचे नाव

 

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील वैष्णवी पाटील हिने ४२ व्या एन. टी. पी. सी. ज्युनियर राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना प्रभावी कामगिरी नोंदविली आहे. तिने वैयक्तिक तीन रौप्य आणि सांघिक कामगिरीत एक सुवर्ण अशी एकूण चार पदके मिळवून करमाळ्याचे नाव देश पातळीवर उंचावले आहे.पणजी ( गोवा ) येथे नऊ ते अकरा नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये पाटील हिने इंडियन बो स्पर्धा प्रकारात एकवीस वर्षेखालील वयोगटात खेळताना तिने चार पदके पटकावून यश मिळविले. तिने तीन रौप्य पदके वैयक्तिक प्रकारात मिळविली. तर सांघिक प्रकारात समृद्धी पवार (अरण, ता. माढा ) व साक्षी फाटे (नाशिक) यांच्यासह सुवर्ण पदक पटकविणारी कामगिरी केली.

तिरोडा (गोंदिया) येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशानंतर गोवा राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती. तिला मोडनिंब येथील एकलव्य ऍकॅडमीचे विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या यशानंतर बोलताना पाटील हिने या यशाने आनंद झाला आहे. आता अरण येथे होणाऱ्या शालेय स्पर्धेत सतरा वर्षेखालील वयोगटात सहभागी होवून सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. तिच्या या यशांनंतर विविध स्तरातून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.                       प्रतिकुल परिस्थितीवर केली मातकरमाळ्यात आर्चरीचे प्रशिक्षण मिळत नाही. त्यावर पर्याय म्हणून वैष्णवी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे विठ्ठल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. दरम्यान राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असताना स्पर्धेला जाण्याच्या अगोदर बाण मारायच्या बोटाला जखम झाली होती. मात्र तिने जिद्दीने सराव सुरु ठेवला. गोवा स्पर्धेत सहभाग नोंदवीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने चार पदके मिळवणारे यश प्राप्त केले. अशी माहिती तिचे वडील कुमार पाटील यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

57 mins ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

4 hours ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

24 hours ago

करमाळ्यात ‘ज्ञान माऊली’ सांस्कृतिक उपक्रम उत्साहात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…

2 days ago