करमाळा प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे सोमवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची २२८ वी जयंती साजरी होणार असून जयंती निमित्त करमाळा शहरा मध्ये प्रथमच मातंग समाज नेते स्व.नामदेव जगताप युवा मंच चे अध्यक्ष युवराज भाऊ जगताप यांच्या सौजन्याने आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अर्धकृती पुतळा (मुर्ती) जयंती च्या पार्श्वभूमीवर आणण्यात आली. आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे हे महापराक्रमी योद्धा होते पुणे येथे पहिली तालीम बांधणारे पहिले वस्ताद ठरले ते फुले,टिळक,आगरकर ,उमाजी नाईक,वासुदेव फडके आशा अनेक महापुरुषांना ते गुरू आहेत. अशा महा क्रांतिकारक क्रांतिवीराची जयंती उत्साहात साजरी होणार असून यांना अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू,समाजिक संघटना विविध नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. अशी माहीत मातंग एकता आंदोलन चे करमाळा शहराध्यक्ष युवराज जगताप यांनी दिली.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…