वन लीफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये पंचफुला या लघुपटला सर्वोत्तम ड्रामा व सर्वोत्तम संकल्पना विजेता म्हणून घोषित

घारगाव प्रतिनिधी
घारगाव येथील विशाल सरवदे हा विद्यार्थी त्याच्या मित्रासह लघुपट तयार करतो व्यसनमुक्तीचा विचार करताना समाज माध्यमांच्या विळख्यात सापडलेल्यांना जागे करण्यासाठी *पंचफुला* या कलाकृतीचे होते कौतुक
पंचफुला या लघुपटाला सर्वोत्तम ड्रामा आणि सर्वोत्तम संकल्पना विजेता म्हणून घोषित.
विशाल म्हणाला या लघुपटाच्या पटकथालेखन दिग्दर्शक पासून काम केले आहे सध्या मी पुणे येथे डीएड कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे लहानपणापासून मला चित्रपटात व वाचनात रस असून वेगवेगळ्या ‌ गोष्टी करून पाहायला आवडतात काही समजून घ्यायचं असेल तर ते स्वतः केल्यावर नीट लक्षात राहते लघुपट गोडी निर्माण झाल्यानंतर मी त्यामध्ये शिकायचं ठरवलं
पुणे येथे एपीजी लर्निंग या नामांकित संस्थेत प्रवेश घेतला आणि डिजिटल फिल्म मेकिंग कोर्स पूर्ण केला त्यानंतर एपीजी लर्निंग या नामांकित संस्थेने आयोजित केलेल्या ए पी जी लर्निंग शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये मी सहभाग घेतला त्यानंतर एका लघुपट महोत्सवातील स्पर्धेत लघुपट पाठवायचं मी मित्रासोबत ठरवलं व्यसनमुक्ती बद्दल विचार करताना समाज माध्यमांच्या विळख्यात सापडलेल्या बद्दल जागृती करण्याची गरज वाटली यातूनच मी पटकथा लिहिली मला
जे सुचलं होतं ते कशा पद्धतीने पडद्यावर दिसायला हवं याची पूर्ण स्पष्टता मनात होती
या कलाकृती बरोबरच आम्ही तयार केलेले *गैरसमज, पो पो….., चहा , पैज, व्यसनाधीन* आणखी काही लघुपट मी समाज माध्यमावर प्रसारित केले आहेत या क्षेत्रात मला पुष्कळ काही करायचं आहे लोकशिक्षणासाठी लघुपट माहितीपट व चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकतं हा विचार स्वतः या संदर्भात काम करून पाहिल्याने पक्का झाला आहे आणि एक दिशाही मिळाली आहे
सध्या अधून मधून एका चित्रपटावर देखील लेखन चालू आहे
पंचफुला या लघु चित्रपटांमध्ये प्रमुख कलाकार म्हणून महारुद्र होगले कोमल वाघमोडे कनुप्रिया ढगे व सह कलाकार काशिनाथ आबा होगले चेअरमन योगिता काशिनाथ होगले बालकलाकार पृथ्वीराज काशिनाथ होगले प्रतिक्षा काशिनाथ होगले प्राजक्ता काशिनाथ होगले अश्विनी अण्णा होगले पवनराज काशिनाथ होगले स्वरा भाऊसाहेब सरवदे अमृता अमोल सरवदे सृष्टी भाऊसाहेब वायकुळे संजीवनी पानाचंद होगले पायल अनिल केसकर सोनाली दत्तात्रय मस्तूद या सर्वांनी उत्तम रित्या काम केले विशेष सहकार्य काशिनाथ वायकुळे संजय सरवदे यांनी केले घारगाव आणि घारगाव परिसरामध्ये शूटिंग सर्वांच्या सहकार्यानं व्यवस्थितरीत्या पार पडले होते सर्व कलाकारांचे सहकलाकारांचे सहकारयांचे ग्रामस्थांचे मनापासून आभार डायरेक्टर विशाल सरवदे यांनी मानले.
वन लीफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला या सत्राचे विजेते म्हणून घोषित करण्यासाठी आनंद वाटत आहे, तुमचा चित्रपट आमच्या तरुण चित्रपट निर्मात्यांसाठी आणि समाजासाठी एक उदाहरण आहे तसेच आम्ही भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो.

saptahikpawanputra

Recent Posts

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

1 day ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

1 day ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

2 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

2 days ago

करमाळा एमआयडीसी मधील भूखंड वाटपास सुरुवात उद्योजकांनी लाभ घ्यावा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…

5 days ago