करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल व दत्तकला सी.बी.एस.ई. स्कूल येथे भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. माया झोळ उपस्थित होत्या. नेहरूजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री प्रताप कडू यानी, नेहरूजींचे मुला लहान मुलांबद्दल असलेल्या प्रेम सांगितले विचार मुलांना सांगितले.एस. एस. सी विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाषणामधून आराम हराम है हे त्यांचे विचार सांगितले: सी.बी.एस ई विभागामध्ये बालदिनाचे औचित्य साधून स्टुडंट लिड कॉन्फरन्स हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अभ्यासक्रमातील काही विषय विद्यार्थ्यांनी सौ. सचिव झोळ मॅडम यांच्या समोर सादर केले.याप्रसंगी बोलत असताना सौ. झोळ मॅडम यांनी विद्यार्थ्याना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यानी करत असलेल्या उपक्रमाबाबत त्याचे कौतुक केले व दत्तकला शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असते असे ही म्हणाल्या.या कार्यक्रमाला दोन्ही विभागाच्या प्राचार्या सौ नंदा ताटे व सौ सिंधू यादव तसेच विभागप्रमुख श्री.धर्मेंद्र धेंडे सौ. संगिता खाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. निलेश पवार यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…