सोलापूर जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर आणि विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्टार्टप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून नव उद्योजक निर्माण करण्यासाठी गुणवत्ता प्रशिक्षण बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय, ग्रँड चॅलेंज यासारखे अमिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. नाविन्यपूर्ण कल्पकतेला भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नोकरीला योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या नव्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यामार्फत स्टार्ट अप यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्टार्टअप यात्रेमध्ये तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा घेण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसमूह एकत्र होण्याच्या उद्देशाने स्टार्टअप यात्रेच्या प्रचार व प्रबोधनासाठी एक फिरते वाहन येणार आहे. दि.२१/११/२०२२ रोजी हे वाहन करमाळा तालुक्यातील खेड्यापाड्यांमधून स्टार्ट अप यात्रेची माहिती नागरिकांना देणार आहे. उद्योगासंदर्भात नाविण्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना दि.२२/११/२०२२ रोजी सकाळी १० वाजता चव्हाण महाविद्यालयातील विद्यालयातील विजयश्री सभागृहामध्ये उपस्थित राहून सादर करू शकतात. सादरीकरण करण्यासाठी शिक्षण व वयाची अट नाही. तसेच पहिल्या तीन उत्कृष्ट सादरीकरणांस आकर्षक रकमेची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तरी या स्टार्ट अप यात्रेमधून तज्ञ व्यक्तींकडून होणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी घ्यावा तसेच स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विद्या विकास मंडळाचे सचिव श्री. विलासराव घुमरे, अध्यक्ष.मिलिंद फंडसर प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, उपप्राचार्य लेफ्टनंट संभाजी किर्दा्क आणि स्टार्टअप यात्रेचे विद्यापीठ संचलित इन्क्युबेशन सेंटरचे समन्वयक श्री. श्रीनिवास नलगेशी यांनी केले आहे.
सदर स्टार्ट अप यात्रेसंबंधात अधिक माहिती साठी प्रा. कृष्णा कांबळे आणि प्रा. प्रदीप मोहिते यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…