प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी सुस्थित आणुन गतवैभव मिळवुन देण्यासाठी आदिनाथच्या प्रत्येक संचालकांनी किमान पाच लाख रुपये द्यावेत करमाळ्याचा आशास्थान असलेल्या आदिनाथ कारखान्याला वाचवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बागल गटाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय भगवान गिरमकर यांनी केले आहे.याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी चेअरमन यांनी 25 लाख रुपये बागल व पाटील गटाच्या नेत्यांनी किमान 25 लाख रुपये तरी द्यावेत म्हणजे खऱ्या अर्थाने आदिनाथ साखर कारखान्यावर आपली निष्ठा असल्याचे सर्वसामान्य शेतकऱ्याला व जनतेला समजेल. त्यामुळे आता आपल्या घरचा हक्काचा कारखाना तरी चालू करण्यासाठी प्रत्येकाने आर्थिक सहकार्य करा नाहीतर माझा ऊस चाललाय अंबालिकाला आणि मी शेतकऱ्यांना म्हणतोय ऊस आदिनाथ देणार असे नाही चालणार आता बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व आहे जनता हे सगळं काही बघत आहे त्यामुळे आता नुसतं बोलून चालणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला जाब विचारणार आहे त्यामुळे आता आदिनाथ कारखान्याचा बॉयलर पेटवुं कारखाना चालू केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आधी आदिनाथ कारखाना चालू करू आणि मगच निवडणुकीला सामोरे जाऊ मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे पण सर्व सामान्य आदिनाथ वाचला पाहिजे ही माझी तळमळ असून त्यासाठी मी स्वतः दोन लाख रुपये देण्यास तयार आहे त्यामुळे आता नेत्यांनी आपले मन मोठे करून आदिनाथ चालू करावा हीच आमची नेते बागल गटाची इच्छा आहे आता बागल अन पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारखाना चालू करण्यासाठी आपले फुल नाही फुलाची पाखळी म्हणून आर्थिक सहकार्य करावे कारखाना चालु करा असे आवाहन दत्तात्रय गिरमकर यांनी केले आहे.