वांगी प्रतिनिधी वांगी नं:4 ता. करमाळा येथील कु सोनाली जयसिंग शेटे हिची राज्य विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाली आहे. सोनालीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वांगी नं.4 येथे झाले तसेच माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वांगी नं.1 येथे झाले तसेच तिचे उच्च माध्यमिक शिक्षण शारदानगर बारामती येथे झाले, तसेच महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथे झाले. तिने सन 2020 रोजी राज्य विक्रीकर निरीक्षक पदाची परीक्षा दिली होती तिचा निकाल लागला असुन तिची नियुक्ती झाली आहे. तिच्या या यशा बद्दल वांगीचे माजी सरपंच श्री. विठ्ठल शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रा. शिवाजीराव बंडगर आदीनाथचे माजी व्हाईस चेअरमन श्री. शहाजीराव देशमुख,दत्ताबापू देशमुख सदस्य ग्रामपंचायत वांगी १ पुणे पोलिस श्री. सोमेश्वर यादव, अमोल मानेसाहेब वडील जयसिंग रंगनाथ शेटे ,सौ. सुशीला जयसिंग शेटे ,भाऊ धनसिंग जयसिंग शेटे ग्रामपंचायत सदस्य वांगी नं:4 तसेच सर्व ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…