करमाळा प्रतिनिधी
यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी अगोदरच अडचणीत असताना, सध्या वीज वितरण कंपनीकडून सुरू असलेली विज बिल वसुली अन्यायकारक असून, महावितरण कडून शेतीपंप व घरगुती वीज बंद करण्याचे जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबवावे. व वीज जोडणी पूर्ववत करावी. अशी मागणी आ. संजयमामा शिंदे यांनी केली आहे. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊसच एवढा होता की शेताला पाणी लागले आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी विजेचा वापर ही शेतकऱ्यांना करता आलेला नाही. असे असताना ही शेतकऱ्यांकडून सक्तीने वीज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे हे चुकीचे आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना, त्याला विज बिल भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी देणे आवश्यक आहे. तसेच विज बिल भरणे विषयी पूर्वसूचना ही महावितरण कंपनीने द्यायला हवी. असे कोणतेच काम महावितरण कंपनीने केलेले नाही. सरसकट वीज बंद करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने ही अन्यायकारक वसुली तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.वीज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिक व पशुधनाला पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी ,बँका ,शासकीय कार्यालय यांना ही काम करण्यास अडचणी येत आहे .त्यामुळे महावितरण कंपनीने या सर्व बाबींचा विचार करून वीज तोडणी थांबवावी, व विज जोडणी पूर्ववत करावी. अशी मागणी आ. शिंदे यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…