करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील अनेक भागातील शेतीपंपाचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने पुर्वसुचना न देता खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असुन प्राधान्याने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केली आहे.
बागल म्हणाले, कालपासून करमाळा तालुक्यातील पुर्व भाग, कंदर परीसर व इतरत्र वीज वितरण कंपनीने वीज बीलांच्या वसुलीसाठी सरसकट कोणालाही पुर्वसुचना न देता वीजपुरवठा बंद केला आहे. वास्तविक त्यामुळे रब्बी पिके कांदा, ज्वारी, त्याचबरोबर ऊसपिकांचेही नुकसान होणार आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वीजपुरवठा बंद केल्याने मुक्या जनावरांचे अतोनात हाल होत आहे.वीज मंडळाने आपल्या बिलांच्या वसुलीसाठी सरकट वीज बंद करणे ही बाब गंभीर व चुकीची आहे. वास्तविक पाहता वीज कंपनीने शेतकऱ्यांना पुर्वसुचना अथवा नोटीस द्यायला हवी होती. परंतु कालपासून कंदर वीज उपकेंद्र अचानक पणे बंद केले गेले. तसेच पुर्व भागातही गौंडरे,कोळगाव, या गावातील वीज डि.पी.बंद केले आहे.
तालुक्यातील पश्चिम भाग रावगाव, मांगी, पोथरे या भागातही शेतकरी धास्तावले आहेत. कोरोना, अतिवृष्टी व सातत्याने हवामान बदलामुळे शेतकरी पुरता अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांनीही वीज बील वेळेवर भरणे गरजेचे आहे. परंतु सरसकट वीज बंद करु नये. शेतकरी नुकताच अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय.पाणी सर्वत्र मुबलक असतांना आता वीजमंडळाच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. याबाबत तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार सहानभूती पुर्वक करून वीज पुरवठा तातडीने सुरू करावा असे म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…