आदिनाथ कारखाना चालु करायचा असेल तर सभासदानी आर्थिक सहकार्य करा अन्यथा कारखाना चालु करायचा का नाही तर तुम्हीच सांगा- हरीदास डांगेसाहेब

करमाळा प्रतिनीधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आधारवड ठरलेल्या तीस हजार सभासद असलेल्या आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठी प्रत्येक सभासदांनी पाचते दहा हजार रुपंयाची  आर्थिक मदत केली तर कारखाना चालु होईल अन्यथा कारखाना चालु होणे अशक्य आहे त्यामुळे सर्वानी विचार करुन ठरवा आदिनाथ कारखाना चालु करायचा आता आपल्या हातात पण प्रत्येकांनी फुल ना फुलाची पाकळी सहकार्य करावे असे आवाहन हरीदास डांगेसाहेब यांनी केले आहे.आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठी आदिनाथ कारखान्यावर बोलावलेल्या मिंटीगवेळी बोलताना सांगितले. मी माझ्या अनुभवाचा फायदा आपल्या आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठी होईल या उद्देशाने आपल्या तालुक्यातील मंडळीच्या आग्रहामुळे यामध्ये सहभागी झालो आहे.आता सत्तर टक्के काम झाले आहे तीस टक्के बाकी असुन त्यासाठी पैशांची गरज आहे आपण सहकार्य केले तर कारखाना चालु होईल मी स्वत पाच लाख दिले आहे मी कारखान्यासाठी आणखी पाच लाख देत आहे. या बैठकीला आदिनाथचे जेष्ठ संचालक डाॅ वसंतराव पुंडे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख बापुराव देशमुख लालासाहेब जगतापसर शिवाजीराव बंडगर सर गणेश करे पाटील राजेंद्र बेरे,दत्तात्रय जाधव गोरख आप्पा जगदाळे  यांच्या उपस्थितीत बैठक चालु आहे. आदिनाथ कारखान्यासाठी ना. तानाजी सावंतसरांनी ९ कोटी रुपये भरले आहेत चार पाच कोटीसाठी कारखाना दुसऱ्याच्या घश्यात घालु नका असे ते म्हणाले आहेत. मा.आमदार नारायण आबा पाटील बागल गटाचे नेत्या रश्मी दिदी बागल या गटाचे संचालक मंडळ सभासदांचे सहकार्य लाभत आहे. याबाबत बोलताना हरीदास डांगेसाहेब म्हणाले जरी सभासद मिटिंगला उपस्थित नसले तरी बऱ्याच सभासदानी फोन करुन आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे आदिनाथ कारखाना चालु करण्यासाठीची रक्कम येत्या आठ दिवसात जमा होईल व आदिनाथ साखर कारखाना नक्की चालु होणार असल्याचे सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल शंभूराजे जगताप यांचा टीडीएफतर्फे गौरव टीडीएफचे पुणे विभागीय उपाध्यक्ष मुकुंद साळुंखे सर यांच्या हस्ते सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

1 day ago

सांगोल्यातील डॉ.धनाजी जगताप व डॉ.सारिका जगताप यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व मोफत औषध उपचार

सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…

2 days ago

करमाळ्याच्या मातीतील रंगांचा दिल्लीच्या क्षितिजावर आविष्कार… चित्रकार निवास कन्हेरे यांचे ‘Prismatic Resonances’ चित्रप्रदर्शन; २३ नोव्हेंबरपासून राजधानीत कलात्मक पर्वणी

  करमाळा  प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…

2 days ago

करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी तात्यासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड व्हा. चेअरमनपदी निशांत खारगे, तर सचिवपदी अजित कणसे यांची निवड

  करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…

2 days ago

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…

3 days ago