करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात झाली असुन काल तीन रूग्ण बाधीत आढळल्या नंतर करमाळा शहरातील अनेक भाग सील करण्यात आला असुन प्रशासनाने वेळीच रॅपीट टेस्टिंग घेतल्या मुळे हा धोका संथ गतीने वाढत असला तरी कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव शहरात पसरत असल्याचे दिसून येत आहे हया पार्श्वभूमीवर करमाळा शहरात 1ऑगस्ट पासून 14 दिवसाचा लाॅकडाऊन जाहीर करावा अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे
यावेळी नानासाहेब मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या करमाळा शहरातील कोरोना बाधित रूग्णाकडुन अनेक नागरीक संपर्कात आलेले आहेत त्यामुळे करमाळा शहरात टेस्टिंग साठी अँटीजीन रॅपीट टेस्टिंग साठी 2000/–कीट ची गरज आहे . त्यामुळे करमाळा शहरातील संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची अॅन्टीजीन रॅपीट टेस्टिंग करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…