करमाळा प्रतिनिधी
करमाळा गायरान जमिनीवरीील अतिक्रमणे निष्काशीत करणे संदर्भात ऊच्च न्यायालयाने जो आदेश देण्यात आलेला आहे.तो आदेश रद्द करण्यासाठी शासनस्तरावर योग्य पाऊले उचलावीत अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
याविषयी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की करमाळा तालुक्यातील अनेक गावातील नागरीक मागील तीस ते चाळीस वर्षा पासुन गायरान जमिनीत लोकवस्ती करुन राहत आहेत.परंतु गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढणे संदर्भात शासनाने नोटीसा बजावलेल्या आहेत. यामध्ये अनेक गोरगरीब,भूमिहीन,भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांचा समावेश आहे.त्यामुळे अनेक संसार ऊघड्यावर येणार आहेत. तसेच सरकारी व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढल्यास राज्यभरातील अडीच ते तीन लाख अथवा त्याहून अधिक कुटुंब व जवळपास १२ ते १५ लाखांहून अधिक लोक बेघर होऊ शकतात. परिणामी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवणार असल्याचे बागल यांनी म्हटले आहे. त्यामुळे शासन स्तरावर योग्य ती कार्यवाही करत नागरीकांना दिलासा द्यावा असे निवेदन बागल यांनी दिले आहेे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…