करमाळा प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल केलेले विधान आम्ही कदापी सहन करणार नाही. कोश्यारी हे सतत महापुरुष यांच्याबदल चुकीचे वक्तव्य करून वाद निर्माण करत आहेत श त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संतप्त शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. करमाळा येथील सुभाष चौकात सर्व शिवप्रेमींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केल्याने सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करत मंगळवारी (ता. २२) शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी बंदोबस्त ठेवला होता.
करमाळ्यातील शिवप्रेमी विविध संघटना व पक्षांचे कार्यकर्ते यावेळी एकत्र आले होते. शिवप्रेमींनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. कोश्यारी यांचा तयार केलेला प्रतीकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले. दरम्यान काही शिवप्रेमींनी मनोगत व्यक्त करत कोश्यारींनी केलेल्या विधानाचा समाचार घेत त्यांनी राजनामा देऊन शिवप्रेमीच्या भावनाची कदर करण्याचे आवाहन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जयवंतराव जगताप यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…
करमाळा प्रतिनिधी उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या AI डेटा सेंटर आणि विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात युवक…
सांगोला प्रतिनिधी सांगोला शहरातील प्रसिद्ध असलेल्या डॉ. धनाजी जगताप व डॉ. सारिका जगताप यांच्या हॉटेल…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण मातीतील संवेदना, मानवी भावविश्व आणि सर्जनशीलतेला आपल्या कुंचल्यातून वैश्विक ओळख मिळवून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…