Categories: करमाळा

निंभोरे ते कोंढेज रस्त्यावरील स्थगिती उठवावी… युवा नेते रवींद्र वळेकर यांची आ.संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांसाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार करमाळा मतदारसंघातील 8 रस्त्यांसाठी 24 कोटी रुपयांची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेली होती. त्यामध्ये पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज कोंढेज निंभोरे मलवडी दहिवली कनेरगाव वेणेगाव ते रामा क्रमांक 9 ला जोडणारा प्रजिमा क्रमांक 4 ( भाग कोंढेज ते निंभोरे ) या रस्त्यासाठी 3 कोटी 32 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झालेला होता .परंतु महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने आलेल्या सरकारने सर्वच कामावरती स्थगिती दिल्यामुळे सदर काम अद्याप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर युवा नेते रवींद्र वळेकर यांचे नेतृत्वाखाली निंभोरे ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन दिले.

सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की निंभोरे ते कोंढेज हा रस्ता श्री निवृत्ती महाराज यांच्या पालखीचा परतीचा मार्ग आहे .या मार्गासाठी आपण 2021 – 22 चे अर्थसंकल्पामध्ये 3 कोटी 32 लाख 50 हजार एवढी भरघोस निधीची तरतूद केलेली आहे.परंतु मध्यंतरी या कामावरती स्थगिती देण्यात आली . सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागात पोहोचल्यामुळे येथे ऊस व केळी या पिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खूप धोक्याचा झालेला आहे त्यामुळे सदर कामावर दिलेली स्थगिती उठवणे संदर्भात आपण शासन स्तरावरती तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनामध्ये केलेली आहे.
चौकट –
सर्वच कामावरील स्थगिती लवकरच उठणार –
आ. संजयमामा शिंदे .
नवीन सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या ज्या ज्या कामावरती स्थगिती दिलेली आहे .ती स्थगिती लवकरच उठेल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी याप्रसंगी दिली. डिकसळ पूल तसेच करमाळा शहरातील नव्याने बांधण्यात येणारी नगर परिषदेची इमारत व सांस्कृतिक सभागृह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या कामावरती दिलेली स्थगिती ही उठलेली आहे .त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या कामावरील स्थगिती निश्चितच उठेल असा विश्वास आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

निंभोरे ते कोंढेज रस्त्यावरील स्थगिती उठवावी…
युवा नेते रवींद्र वळेकर यांची आ.संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी…
प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांसाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार करमाळा मतदारसंघातील 8 रस्त्यांसाठी 24 कोटी रुपयांची तरतूद महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये झालेली होती. त्यामध्ये पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज कोंढेज निंभोरे मलवडी दहिवली कनेरगाव वेणेगाव ते रामा क्रमांक 9 ला जोडणारा प्रजिमा क्रमांक 4 ( भाग कोंढेज ते निंभोरे ) या रस्त्यासाठी 3 कोटी 32 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर झालेला होता .परंतु महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने आलेल्या सरकारने सर्वच कामावरती स्थगिती दिल्यामुळे सदर काम अद्याप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर युवा नेते रवींद्र वळेकर यांचे नेतृत्वाखाली निंभोरे ग्रामस्थांनी सदर रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन दिले.
सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की निंभोरे ते कोंढेज हा रस्ता श्री निवृत्ती महाराज यांच्या पालखीचा परतीचा मार्ग आहे .या मार्गासाठी आपण 2021 – 22 चे अर्थसंकल्पामध्ये 3 कोटी 32 लाख 50 हजार एवढी भरघोस निधीची तरतूद केलेली आहे.परंतु मध्यंतरी या कामावरती स्थगिती देण्यात आली . सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागात पोहोचल्यामुळे येथे ऊस व केळी या पिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. सदर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खूप धोक्याचा झालेला आहे त्यामुळे सदर कामावर दिलेली स्थगिती उठवणे संदर्भात आपण शासन स्तरावरती तातडीने प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनामध्ये केलेली आहे.
चौकट –
सर्वच कामावरील स्थगिती लवकरच उठणार –
आ. संजयमामा शिंदे .
नवीन सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या ज्या ज्या कामावरती स्थगिती दिलेली आहे .ती स्थगिती लवकरच उठेल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी याप्रसंगी दिली. डिकसळ पूल तसेच करमाळा शहरातील नव्याने बांधण्यात येणारी नगर परिषदेची इमारत व सांस्कृतिक सभागृह आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या कामावरती दिलेली स्थगिती ही उठलेली आहे .त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या कामावरील स्थगिती निश्चितच उठेल असा विश्वास आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

35 mins ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

1 hour ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago