आदिनाथ साखर कारखाना चालु होण्यासाठी सर्वाच्या सहकार्याची वाट बघतोय पुढाऱ्यांनो बोलण्यापेक्षा कारखाना चालु करा राजकीय इच्छाशक्तीची काळाची गरज आहे.करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याच्या जीवनाला वरदान ठरलेला आदिनाथ कारखाना सध्या सुरू होण्याची वाट बघत आहे. आदिनाथ कारखाना चालू झाल्यापासून करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले अनेकांना समृद्धीचे जीवन देणारा आदिनाथ कारखाना चालू होण्याच्या प्रगतीपथावर आहे करमाळा तालुक्याचे राजकारण आदिनाथ कारखान्यावरच अवलंबून असून सध्या हाच कारखाना चालू करण्यासाठी बागल गट पाटील गट विद्यमान संचालक मंडळ तो मार्गदर्शक हरिदास डांगे साहेब हे प्रयत्न करत आहेत आजिनाथ कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्याच्या उसाचा अतिरिक्त प्रश्न सोडवण्यासाठी आदिनाथ कारखाना हा एकमेव पर्याय असून शेतकऱ्यांनी नंतर ऊस घालण्यासाठी इतर कारखान्याच्या हाता पाया पडून टोळीसाठी पैसे देण्यापेक्षा आपल्या हक्काचा असलेला आदिनाथ कारखान्याला जर पाच दहा हजाराची मदत केली तर हा कारखाना स्वाभिमानाने चालू होऊन शेतकऱ्याची सभासदाची व कामगाराची जीवनमान बदलू शकतो याचा विचार आदिनाथ कारखान्याचा 30000 सभासदांनी केल्यास हा कारखाना पुन्हा जोमाने सुरू होऊन आपल्या जीवनात समृद्धी आणणार आहे विचार करा सर्वांनी आता बोलण्यापेक्षा कारखाना चालू करण्याकडे आपली कृती पूर्ण मदत करून आदिनाथ कारखान्याला गत वैभव मिळवून देण्यासाठी काम करावे आदिनाथ महाराज कृपा आपल्यावर नक्की होईल त्यामुळे आता राजकारण करण्यापेक्षा आपल्या हक्काचा चालू हक्काचा कारखाना चालू करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्या हीच अपेक्षा.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…