करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याचा आधारवड असून या आदिनाथ कारखान्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जीवनमान उंचावले आहे मागील तीन ते चार वर्षापासून आदिनाथ कारखाना बंद आहे. आदिनाथ कारखान्यावर बागल पाटील गटाची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळामध्ये आदिनाथ कारखाना काही काळ उत्तमरीत्या चालला परंतु कामगाराच्या थकलेले पगारी कारखान्यावर झालेले कर्ज त्यामुळे राजकारणाला आपल्या अस्तित्वाला धक्का पोहोचेल व आदिनाथ कारखान्याच्या अपयशाचे खापर आपल्यावर फुटेल या भावनेतून पाटील गटाचे संचालकांनी राजीनामे दिले होते बागल गटाचे संचालकांनी काही काळ तक धरला परंतु कारखान्यालाही कुठूनही कर्ज न मिळाल्यामुळे बागल गटाच्या प्रयत्नालाही अपयश आल्याने कारखाना पवार यांना भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेऊन बागल गटारी प्रक्रिया पूर्ण केली परंतु दोन वर्ष पवार यांनीही हा कारखाना चालू केला नाही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने बागल पाटील गटाची मोठी पंचायत झाली भागलास काही प्रमाणात मकाई कारखान्याला तर पाटील गटाचा ऊस भैरवनाथ अंबालिका साखर कारखान्याला गेला असला तरी ऊसतोड करण्यासाठी या कारखान्याचे उंबरठे झिजवण्याचे काम ही सर्वसामान्य शेतकरी वर्गाला करावा लागले आहेत तसेच ऊसतोड वाहतूक खाजगी पद्धतीने केल्यामुळे एकरी पाच ते दहा हजाराचे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागले आहे त्यामुळे आता आदिनाथ कारखाना चालू झाला पाहिजे अशी भावना सभासदामध्ये निर्माण झाले या भावनेतूनच आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावर चालवा या भावनेतून आदिनाथ बचाव समितीच्या माध्यमातून हरिदास डांगे साहेब तसेच बागल पाटील गटाची नेते यांनीही सर्व ताकद पणाला लावून कारखाना आपल्या आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले कारखाना चालू करण्यासाठी आरोग्य मंत्री नामदार तानाजी सावंत यांनी नऊ कोटी रुपयांची मदत केली पाटील गटाचे नेते नारायण आबा पाटील व बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी कारखाना कसलेही परिस्थितीत चालू करायचा या भावनेतून घेऊन कारखान्याचे कामकाज सुरू केले. आदिनाथ कारखाना चालु करण्याची बैठक चालु असताना विधानसभेला तुम्ही मला पाठींबा देणार आहात असा शब्द तानाजी सावंतसरांना दिला आहे असा भरसभेत रश्मी दिदींना सवाल केला यावेळी दिदी स्पष्ठ शब्दात सांगितले की आदिनाथ कारखान्यासाठी आपण एकत्र काम करा असे सांगितल्याचे भरसभेत सांगितले तेथुनच कारखाना चालु होण्याच्या हालचाली बंद झाल्या आहेत .आदिनाथ बचाव समितीने आपल्यापरीने निधी जमा करून कारखाना दुरुस्तीचे काम चालू केले 45 लाख रुपये जमा झाले सुमारे चार ते पाच कोटी रुपयांची कारखाना सुरळीत चालू होण्यासाठी गरज असताना आत्तापर्यंत अपेक्षित रक्कम जमा झाली नाही कारखाना एक डिसेंबरला सुरू होईल अशी भावना शेतकरी सभासदांमध्ये जरी असली नेत्यांनी जरी घोषणा केली असली आता मात्र बागल पाटील गटाच्या नेत्यांनी संचालकांनी सभासदांना दिलेला शब्द पाळून ठेवी स्वरूपात का होईना सर भावनेतून आपली ताकद पणाला लावून आदिनाथ साठी ठेवीच्या माध्यमातून हा पूर्ण शेअर पूर्ण करण्याच्या माध्यमातून आर्थिक निधी जमा करून कारखान्याचा कारखान्याचा बॉयलर पेटवुन कारखाना दिमाखात चालू करावा आदिनाथ साखर कारखान्यावर अवलंबून असणारे शेतकरी सभासद कामगार या सर्व व त्यांच्या कुटुंबाची जीवनमान अवलंबून आहे. आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असून करमाळा तालुक्यातील राजकारणाचे चित्र बदलण्यास आदिनाथ कारखाना हा मोठा हुकमाचा पत्ता आहे मागे याचा फटका निवडणुकीमध्ये बसला आहे याचा विचार करून आता तरी शहाणे व्हा आदिनाथ कारखाना पाच दहा कोटी साठी दुसऱ्याच्या घासात जाऊ देऊ नका नाहीतर पुन्हा एकदा कारखाना चालू जण झाल्यास न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन आदिनाथ दुसऱ्याच्या ताब्यात जाईल व आपल्याला कायमची मुकावे लागेल राजकीय जोडी सर्वांनी तन-मन जणांनी सहकार्य केल्यास आदिनाथ कारखाना नक्कीच चालू होईल जो यामध्ये प्रामाणिकपणे काम करेल त्याला आदिनाथ चा आशीर्वाद निश्चित लाभणार आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…