करमाळा तालुक्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मनसेचे नानासाहेब मोरेची मागणी

 करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याची तुर उडीद सोयाबीन मका बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करण्यात आले असुन करमाळा तालुक्यातील शेतकरी अद्याप मदतीपासुन‌ वंचित आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी केली आहे.करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही.बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर मद्रुंप या तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे परंतु करमाळा तालुक्याला यामधून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्ग नाराज असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. .                                           अतिवृष्टीने करमाळा तालुक्यातील तुर उडीद सोयाबीन मका बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात आले असून शासनाला त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे शासनाकडून लवकरच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर होणार आहे याबाबत आमचा पाठपुरावा चालू असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला नक्की मदत मिळणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले आहे. समीर तहसीलदार करमाळा.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago