करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे उद्योजक राजुरी गावचे सुपुत्र संतोष काका कुलकर्णी यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांचा आदर्श घेऊन युवा पिढीनी वाटचाल करावी असे मत पत्रकार दिनेश मडके यांनी व्यक्त केले. संतोष काका कुलकर्णी यांच्या 55 वा वाढदिवस श्रेणिक खाटेर यांच्या दिव्यरत्न गुरुगणेश गौशाळेत अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था शाखा करमाळा यांच्यावतीने आगळया वेगळयापध्दतीने सामाजिक भावनेने गोशाळेला एक दिवस चारा देऊन साजरा करण्यात आला.वाढदिवसनिम्मित मुक्या जनावरांना चारा देऊन भुतदया हिच खरी ईश्वरसेवा असुन प्रत्येक व्यक्तीनी आपल्या वाढदिवसनिम्मित गौशाळेत गायींसाठी एक दिवसाचा चारा देऊन गोरक्षण कार्य करून गोमातेची सेवा करून पुण्यकर्म करावे असे आवाहन संतोषकाका कुलकर्णी यांनी केले आहेे. .राजुरी गावच्या विकासासाठी संतोष काका कुलकर्णी यांचे महत्वाचे योगदिन असुन त्यांनी समाजसेवेचे कार्य चालू ठेवुन युवापिढीला मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास वर्धमान खाटेर, उद्योजक बाळासाहेब होशिंग उमेेश पवार भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव दिपक चव्हाण, करमाळा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले,सुनील पुराणिक राजुरीचे सरपंच डॉ.अमोल दुरंदे,राजेंद्र सुर्यपुजारी,सुहास काळे,शंकर कुलकर्णी , नरेंद्रसिह ठाकुर शाम सिंधी सिध्देश्वर डास, हरी आगावणे, निलेश गंधे पत्रकार सिध्दार्थ वाघमारे,संजय कुलकर्णी सचिन कुलकर्णी पवनपुत्रचे संपादक पत्रकार दिनेश मडके उपस्थित होते. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार युवा नेते पंचायत समिती सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी करमाळा तालुक्यात उद्योजक निर्माण होण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून करमाळा तालुक्यात उद्योग उभारण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष काका कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण यांनी संतोष काका कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाले की करमाळा तालुक्यात उद्योग उभारणीसाठी आपण आमच्यासारख्या युवा पिढीला मार्गदर्शन करून उद्योजक घडवण्याची कार्य करावे याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले , भाजपचे दीपक चव्हाण, अमरजीत साळुंखे, बाळासाहेब होशिंग आबासाहेब टापरे राजेंद्र भोसले,सिध्दार्थ वाघमारे यांनी संतोष काका कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. या या कार्यक्रमास राजुरी येथील माजी आमदार नारायण आबा पाटिल गटाचे कार्यकर्ते राजेंद्र भोसले.एकनाथ शिंदे. बंडु गुरूजी. आबासाहेब टापरे.बंडु शिंदे .सुनिल कुलकर्णी व सचिन कुलकर्णी तसेच अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था चे सर्व सभासद उपस्थित होते.