वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. आतापर्यत झोळ सोडुन या निवडणुकीत कुणाची एकाची सत्ता नव्हती. वाशिंबे ग्रामपंचायतीवर झोळाचे वर्चस्व होते आता या निवडणुकीत मात्र इतर आडनावाचा उमेदवार देणाऱ्या गटाला पाठींबा देईचा असा निर्णय प्रा.रामदास झोळ यांनी घेतला असल्याने त्यांची भुमिका निर्णयाक ठरणारी आहे. . त्यानंतर आता प्रा. रामदास झोळ ग्रामविकास पॅनलने या निर्णयाचे स्वागत करत ज्येष्ठ नागरिक भानुदास गोपीनाथ टापरे या नावाला बिनविरोधसाठी पाठींबा दर्शवला आहे. .वाशिंबे ग्रामपंचायत बिनविरोध केल्यास १० लाख विकास निधी दिला जाईल असे जाहीर आवाहन प्रा. रामदास झोळ यांनी केले होते. त्यानंतर झोळ आडनाव सोडून जो गट इतर आडनावाचा उमेदवार देईल त्याला पाठींबा दिला जाणार आहे, असा निश्चियच करण्यात आला. काही कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला होता.वाशिंबे ग्रामपंचायत निवडणुकीत झोळ यांच्यासह पवार, शिंदे, टापरे, मगर, वाळुंजकर, यादव, वाघमोडे, जाधव, घोगरे, वजरे, जगदाळे, डोंबाळे, गायकवाड, रंदवे, भुईटे आदी मतदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गावातील प्रमुख नेत्यांनी तालुका पातळीवर जाऊन राजकारण करावे व येथे इतर लोकांमधील उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली बागल पाटील संजयमामा शिंदे गटाची माणसे या पॅनलमध्ये आहेत सर्वसमावेशक विचार करुन एकत्र आलै आहेत. प्रा. रामदास झोळ, नितीन जगदाळे, भानुदास टापरे, हरीचंद्र मगर, बागल गटाचे गणेश झोळ, भाजपचे अमोल पवार, अँड. भाऊसाहेब झोळ, संतोष वाळूंजकर, कल्याण मगर, आप्पा मगर यांच्यात एक बैठक झाली. दरम्यान काही कार्यकर्त्यांशी चर्चाही झाली होती. दरम्यान प्रा. रामदास झोळ ग्रामविकास पॅनेलने भानुदास गोपीनाथ टापरे या नावाला बिनविरोधसाठी पाठींबा दर्शिवला आहे.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…