करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही बाब गंभीर असुन शासनाने व पशुसंवर्धन विभागाने तातङीने करमाळा तालुक्यात पशु क्वारंटाईन सेंटर उभारण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती चिंतामणी जगताप यांनी केली आहे.
करमाळा तालुक्यात एकुण गाय वर्ग जनावरे 64541 आहेत,त्यामधील लम्पी बाधित 3915 आहेत , उपचाराने बरे झालेले जनावरे 2538 आहेत, सद्यस्थितीला उपचार चालु असलेली जनावरे 1117 असुन लम्पी आजाराने मृत जनावरांची संख्या 260 इतकी पोहचली आहे.
या वाढत्या रोगामुळे करमाळा तालुक्यात बाधित पशुं करीता क्वारंटाईन सेंटर ची मागणी करमाळा तालुका पशुसंवर्धन विभागाने त्यांच्या वरीष्ठ कार्यालया कङे केली आहे परंतु अध्याप क्वारंटाईन सेंटर झालेले नाही .
करमाळा तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्याने बाधित पशु पालकांच्या शेतात जावुन उपचार देणे कठीण होत असल्याचे प्रखरतेने जाणवत आहे. या शिवाय बाधित जनावरे इतरत्र असल्याने त्यांचाही संसर्ग वाढत आहे.
त्यामुळे लम्पी क्वारंटाईन सेंटर स्थापन झाल्यास सर्व बाधित जनावरे एकाच ठिकाणी असल्यास उपचारासाठी वेळही कमी लागेल आणि लम्पी रोगाचा प्रादुर्भावही थांबवता येईल , क्वारंटाईन सेंटर करीता जर जागेची गरज पशुसंवर्धन विभागास लागली तर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा उपलब्ध करून देवु , अशी सुचना करीत ,लम्पी क्वारंटाईन सेंटर ची मागणी उपसभापती चिंतामणी जगताप यांनी पशुसंवर्धन विभागाच्या वरीष्ठ कार्यालयाकङे केली आहे.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…