शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सेवा सन्मान सोहळयाचे१ डिसेंबर रोजी आयोजन…

 

मुंबई प्रतिनिधी गोरगरीब-निर्धन रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता “वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर,जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग,नरिमन पॉईंट,मुंबई – ४००००२१ येथे होणार आहे, असे कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे कळविण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री आमदार श्री.बच्चु भाऊ कडू हे असणार आहेत.या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात
सकाळी १०.३०.वाजता मा.श्री.गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. त्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे संपादित वैद्यकीय मदत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील(माजी राज्यपाल, त्रिपुरा,बिहार,पश्चिम बंगाल), मंत्रिमंडळातील सन्माननीय सदस्य सर्वश्री मा.उदय सामंत, मा.शंभूराजे देसाई, मा.दादाजी भुसे, मा.अब्दुल सत्तार, मा.संदीपान भुमरे, मा.दीपक केसरकर, मा.सुधीर मुनगंटीवार, मा.अतुलजी सावे यांच्या हस्ते होणार आहे. उत्कृष्ट निवेदीका आणि सूत्रसंचालिका श्वेता हुल्ले यांच्या सह करमाळ्याचे प्रसिद्ध सूत्रसंचालक शेखर जोगळेकर या सत्राचे सूत्रसंचालन करणार आहेत. पहील्या सत्राअंती दुपारी १.०० ते २.०० वा. स्नेहभोजन होणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात हातकणंगलेचे खासदार मा.धैर्यशील माने आणि मा.गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री) यांचे “शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार – वाढीसाठी रुग्णसेवकांचे कर्तव्य व जबाबदारी” या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
त्यानंतरच्या “आरोग्य परिसंवाद” या कार्यक्रमात सर्वश्री मा.महेंद्र महाजन, मा तुकाराम मुंडे, डॉ.तात्यासाहेब लहाने, डॉ.एस.टी.टाकसाळे, डॉ.विजय सुरासे, डॉ.संजय ओक, मा.संतोष आंधळे, मा.संदीप आचार्य या मान्यवरांचा आरोग्यविषयक परिसंवाद होणार आहे. मा.विशाल बढे आणि सौ.रेश्मा साळुंखे या सत्राचे सूत्रसंचालक असणार आहेत.
यानंतर “वैद्यकीय सेवा सन्मान सोहळा-पुरस्कार वितरण” होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस तसेच मंत्रिमंडळातील सदस्य यांच्या हस्ते आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन मिलिंद भागवत हे करणार आहेत.
मा.प्रसन्न जोशी ( कार्यकारी संपादक,साम मराठी) आणि मा.निलेश खरे (मुख्य संपादक,झी २४ तास),आमदार मा.शहाजीबापू पाटील(ब्रँड ॲम्बेसेडर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष), मा.मंदार पारकर(अध्यक्ष,मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघ),विनोद जगदाळे (अध्यक्ष,टी.व्ही.जर्नालिस्ट असोसिएशन), ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख मा.नरेश म्हस्के आदी सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे तर विशेष अतिथी म्हणून सन्माननीय खासदार, आमदार, पत्रकारिता क्षेत्रातील ख्यातनाम संपादक-पत्रकार आणि “बाळासाहेबांची शिवसेना”चे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या भव्य सोहळ्याचे निमंत्रक सर्वश्री विलास जोशी,अनिल भोर, डॉ.प्रदीप धवळ, डॉ.जे.बी.भोर, हेमंत कट्टेवार,अभिजित दरेकर, राज्य कक्ष प्रमुख रामहरी राऊत, राज्य सहकक्ष प्रमुख ज्ञानेश्वर धुळगंडे हे आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

16 hours ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

18 hours ago

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

2 days ago