संविधान दिन व जागतिक एड्स दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भव्य रॅली

करमाळा प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले . उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , विधी सेवा समिती व वकील संघ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ न्यायाधीश सौ. मिना एक्के , न्यायाधीश शिवपात्री आर. ए. , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , अँड. महादेव कांबळे , अँड. योगेश शिंपी , वकील संघाचे पदाधिकारी , राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तरचे जिल्हा समन्वयक प्रा. एल. टी. राख , कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक तसेच NCCचे CT0 श्री. निलेश भुसारे उपस्थित होते .
संविधान सप्ताह व एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन शहर दणाणून सोडले. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले . तसेच एड्स दिनाचे औचित्य साधन राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती केली सदर रॅलीचे सांगता समारंभ महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला . सांगता समारोप प्रसंगी करमाळ्याच्या न्यायाधीश सौ. मिना एक्के मॅडम यांनी संविधान दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. स्वयंसेवकांचे पथनाट्य पाहून कौतुक केले . तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अँड.महादेव कांबळे यांनी संविधान दिनाची सखोल माहिती सांगितली तसेच या रॅलीमध्ये 9 MAH बटालियनचे कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

21 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago