करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सरपंचपदासाठी १३५ व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी एकुण ६२५ अर्ज आले आहेत. शुक्रवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणुक सनियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे उपस्थित होते.करमाळा तालुक्यात ३० सरपंच व २४४ सदस्यांसाठी ३० गावात ९० प्रभागात निवडणुक होणार आहे. सोमवारी (ता. ५) पंचायत समितीच्या सभागृहात अर्जाची छानणी होणार आहे.
गावनिहाय आलेले सरपंच व सदस्याचे अर्ज (कंसातील आकडे सदस्य आहेत) : वरकाटणे : ४(४१), कात्रज : ४ (१४), गोयेगाव : ४ (१६), हिंगणी : ७ (२५), पोमलवाडी : २ (१०), रिटेवाडी : ५ (७), शेलगाव वा. : ११ (४१), जिंती : ४ (२९), मांजरगाव : ३ (७), पोंधवडी : ४ (२५), कोंढारचिंचोली : ५ (२२), वाशिंबे : १० (३६), वंजारवाडी : ३ (१०), कुंभारगाव : ३ (२३), अंजनडोह : १ (११), कामोणे : ४ (२७), दहिगाव : ३ (२४), देलवडी : ३ (१६), दिवेगव्हण : ४ (३३), तरटगाव : ३ (२१), मोरवड : ८ (२३), लिंबेवाडी : १ (७), खडकी : ५ (१४), सोगाव : ४ (२४), विहाळ : २ (२५), भिलारवाडी : ४ (२४), खातगाव २ (११), पोफळज : ८ (२०), पारेवाडी : ४ (२३) व टाकळी रा. : ८ (१६) असे अर्ज आले आहेत.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…