प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे महत्वाचे गावात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन, यामधे आमदार. संजयमामा शिंदे आणि समविचारी पॅनलच्या उमेदवारांची सरशी होईल असे मत अॅड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केले.पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत देखिल आमदार. संजयमामा शिंदे गटाची सरशी झालेली असुन, दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीत देखिल हे चित्र कायम राहील. होणाऱ्या निवडणुका सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात लढवाव्यात.. आणि आपल्या गावाच्या आणि तालुक्याचे विकासात महत्वाचे योगदान देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. असे आवाहनही त्यानी केले. करमाळा तालुक्यातील राजकारणात दिवसेंदिवस महत्वाचे बदल घडत असुन, आमदार. संजयमामा शिंदे यांचे सक्षम नेतृत्वात काम करण्यासाठी गावोगावची युवक मंडळी अग्रेसर आहेत. गावोगावची लोक गटातटाचे राजकारणाला कंटाळुन विकासाचे मुद्द्यावर एकत्र येऊ लागली आहेत ही करमाळा तालुक्याचे दृष्टीने जमेची बाजु असुन, आमदार. संजयमामा शिंदे यांनी आमदार होण्याचे आधीपासुनच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेपासुन करमाळ्याच्या विकासाला चालना दिली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी गेल्या तीन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळातदेखिल करमाळ्यात अनेक महत्वपुर्ण विकासाचे योजना आणलेल्या असुन, विरोधकांवर टिका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येइल याचे नियोजन केले आहे, परंतु काही मंडळी ऊगाचच आमदारांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचे षडयंत्र करीत आहेत. राज्यातील सत्ताबदलाचे राजकारणामुळे करमाळा तालुक्यातील अनेक मंजुर असलेल्या महत्वाचे योजनांना विद्यमान सरकारने स्थगिती दिलेली असुन, ती स्थगिती देखिल लवकरच उठेल परंतु आपल्या तालुक्यातील विकासकामांना स्थगितीच रहावी म्हणुन देखिल काही दुष्ट शक्ती कार्यरत आहेत.. तरी देखिल यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून करमाळा तालुक्यात अनेक योजना आणुन विकासकामाचा ओघ चालुच ठेवलेला आहे.. आमदार संजयमामा शिंदे हे सोलापुर जिल्हाचे एक व्हीजन असणारे नेतृत्व असुन, ग्रामिण भागातील ग्रामपंचायतीचे निवडणूकामधुन देखिल आमदार संजयमामांना मानणारे अनेक सरपंच,सदस्य निवडुन आले आहेत.. बऱ्याच ठिकाणच्या ग्रामपंचायती बिनविरोध होत असुन, निवडणुक होत असणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायती मधे संजयमामा शिंदे गटाचे उमेदवार उभे असुन काही ठिकाणी गावपातळीवर जगताप गट, पाटील गट आणि बागल गटाबरोबर युती झालेले दिसत आहे.. एकंदरीत दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकामधे देखिल आमदार. संजयमामा शिंदे गटाची सरशी होईल.. हे दिसते.
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…