आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुक्यातील साडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एम   बी.  कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्कार दिलीप डोळस यांना प्रदान

 

करमाळा, दि. ४ : आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुक्यातील साडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रायगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक दिलीप डोळस यांना यंदाचा एम. बी. कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

करमाळा येथील आरोग्य सेवक महादेव बाळा कोष्टी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त येथील यश कल्याणी सेवाभवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज राऊत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा बोंगडे, हिवताप पर्यवेक्षक परमेश्वर वाडेकर, यश कल्याणी संस्थेचे गणेश करे – पाटील, कुरुहीन शेट्टी कोष्टी समाजाचे तालुकाध्यक्ष गजेंद्र गुरव उपस्थित होते.

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले म्हणाले, ‘जीवनाच्या बाबतीतील महत्त्वाची आणि खडतर सेवा आरोग्य सेवक बजावत असतात. पण या आरोग्य सेवकांचा सन्मान होत नाही ही बाब खरी आहे. कोरोना नंतर या सेवेचे महत्व कळले आहे. या आरोग्यसेवकांचा केलेला सन्मान हा खूपच मोलाचा ठरणार आहे. यामुळे सर्व कर्मचारी रिचार्ज होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करत असताना आपण काय करतोय हे आपणास सांगताही यायला हवे. प्रत्येक बालक आजार मुक्त असायला पाहिजे. साथरोगात आरोग्य सेवक काम करतात. अशावेळी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेची साथ मिळणे गरजेचे आहे.’
करे पाटील म्हणाले, ‘गावातील स्वयंघोषित नेतेमंडळी, अधिकारी, आरोग्य सेवकांना अडचणीत आणण्याचे काम करतात. त्यांना भांबावून सोडत असतात. तरीही आरोग्य सेवक निष्ठेने काम करत असतात. अशा आरोग्य सेवकाच्या निधनानंतर त्यांच्या नावाने आरोग्य सेवकांना सुरू केलेला पुरस्कार हा स्तुत आहे.’
गटविकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी प्रशासनाच्या योजनांना प्रतिसाद चांगला मिळत. गरजू जास्त आणि सेवा देणारे कमी होते. त्यामुळे सेवा देणाऱ्यांना गरिबांबद्दल आत्मीयता होती. लाभार्थी जास्त अन् निधी कमी मिळाला तरी सर्व योजनांचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालत. आता चित्र बदलत आहे. श्रीमंती वाढली तरी दारिद्र रेषेखालील लोकांची यादी ही कमी होत नाही. याचा परिणाम आरोग्यच्या निधीवर होताना दिसतो. हे नक्कीच चांगली बाब नाही.’
जगदीश कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले. संपत जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील गुन्हेगावकर, अनिल गुंजेगावकर, मयंक कोष्टी यांनी परिश्रम घेतले

चौकट
आशा क्लिनिक संकल्पना राबविणार

करमाळा तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील लोकांना मुल आजारी पडले तर करमाळा यावे लागते. प्रवास खर्च पाचशे रुपये करून करमाळ्यात आल्यावर मात्र डॉक्टर वाफ देतात. याचा खर्च केवळ तीस रुपये असतो. त्यामुळे अनेक पालक मुलांना दवाखान्यात आणण्यासाठी टाळतात. दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’ च्या धर्तीवर करमाळा तालुक्यात आशा क्लिनिक ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दृष्टीने हालचाली सुरू झाली आहे. प्रशासन शिक्षणाकडून आरोग्याकडे वळत आहे. याची सुरुवात आता या कार्यक्रमाने होत आहे,’ अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली

 

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago