करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात वर्षानुवर्षे करमाळा नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत राहणाऱ्या नागरिकांना वर्ग दोन प्रमाणे मालकी हक्क देऊन त्यावर घरकुल मंजूर करावे ही मागणी 2019 पासून मंत्रालयात प्रलंबित असून यावर तात्काळ निकाल द्यावा असा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेतशिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी निवेदन दिले होते यावर मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करा अशा रिमार्क दिला आहे
प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरी 2022 अंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे बाबतचा प्राथमिक प्रस्ताव मला नगरपालिकेने 4 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता मौलालीचा माळ येथील 284 व इतर भागातील 38 अतिक्रमण क्षेत्रात असलेली असलेली निवासी घरे नियमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी दाखल आहे
महाराष्ट्र शासनाच्या नियम क्रमांक 2018 /197/18 प्रमाणे 17 नोव्हेंबर 2018 प्रमाणे वर्षानुवर्षी नगरपालिका हद्दीत नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत अतिक्रमणित असलेले घरे नियमित करण्याचा आदेश अध्यादेश पारित झालेला आहे मात्र याची अंमलबजावणी करमाळा नगरपालिकेत झालेली नाही यामुळे करमाळा शहरातील तब्बल साडेतीनशे अतिक्रमणातील मालमत्ता धारक यांना स्वतःच्या घराचा मालकी हक्क मिळालेला नाही हा हक्क न मिळाल्यामुळे त्यांना घरकुलाचे अनुदान मिळत नाही
महाराष्ट्रातील इतर नगरपालिका हद्दीत मात्र तीस-पस्तीस वर्षापासून रहिवास असलेल्या नागरिकांना पंधराशे चौरस फुटापर्यंत मालकी हक्क वर्ग दोन प्रमाणे मिळाला आहे मात्र करमाळा शहरातील या अतिक्रमण भागातील झोपडपट्टी विभागातील नागरिक घरकुला पासून वंचित आहेत यामुळे तात्काळ या सर्व मालमत्ता धारकाला शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकी एक हजार पाचशे चौरस मीटरचा मालकी हक्क द्यावा अशी मागणी चिवटे यांनी केली होती .यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक अहवाल सादर करा अशा सूचना दिलेले आहेत
या 350 मालमत्ता धारकांना लवकरच मुख्यमंत्र्यांचे भेटीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली असून या सर्वांना स्वतःच्या मालकीचे घर मिळवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे चिवटे यांनी सांगितले
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…