करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 11 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,
पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की वाढलेल्या महागाई मुळे कित्येक वधू- वर मायबापांना कर्ज काढून हे लग्न सोहळे करावे लागत आहेत ,
पुढे जाऊन याचे रूपांतर कर्जामुळे आत्महत्येत देखील होत आहे, याचाच विचार करून मी व माझ्या सहकाऱ्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे,
आम्ही श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सामाजिक कार्य म्हणून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना गेली 13 वर्षापासून मोफत भात – भाजी वाटप व शहरातील गोरगरीब अनाथ वृद्धांना गेली 5 वर्षापासून दोन वेळचे जेवण देत आहोत, तसेच कोरोना काळात कोविड रुग्णांना आयुर्वेदिक काढा देऊन मदत केली, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो,
या विवाह सोहळ्याचे आयोजन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी 6:00 वाजता करण्यात आले आहे ,
या पत्रकार परिषदेला श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व संचालक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…