करमाळा प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणूक सध्या जोर धरत असुन, आज छाननीची प्रक्रिया पार पडलेली असुन, अनेक कायदेशीर हरकती नंतर उमेदवारांचे अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. परंतु एका कायदेशीर मुद्दयावरून या निवडणुकीतील काही सदस्यांचे सदस्यत्व अडचणीत येणार आहे. याबाबतची कायदेशीर माहीती घेतली असता, चालु ग्रामपंचायतीचे निवडणुकांकरता नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या ऊमेदवारांना निकाल घोषित झालेपासुन तीस दिवसात खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे.. याबाबतचे राजपत्र असुन , ज्या उमेदवारांनी मागील ग्रामपंचायतीची निवडणुक लढविली असेल परंतु मागिल निवडणुकीचा खर्चाचा हिशोब रितसरपणे सादर केला नसल्यास त्यांना पदावरून दुर व्हावे लागेल… वस्तुतः चालु निवडणुकीत उभे राहणारे असे अनेक लोक आहेत ज्यांनी मागिल निवडणुकीचा खर्च सादर केलेला नाही. मान. जिल्हाधिकारी सोलापुर यांनी संबधित लोकांना अद्याप कसलीही नोटीस दिलेली नाही किंवा अनर्ह ठरविले नाही. खरे तर मागिल पहील्या टप्यातील निवडणुकाचे वेळी हिशोब सादर करणाऱ्या व न करणाऱ्या उमेदवार सदस्यांची एक लिष्ट प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना, मागिल निवडणुकीचा खर्च सादर केला नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरलेले नव्हते परंतु आज रोजीचे नामनिर्देशन पत्र भरताना व छाननीचे वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन अशी कोणतीच यादी प्रसिद्ध केलेली नव्हती. त्यामुळे अनेक जणांचे अर्ज वैध झालेले आहेत. परंतु अशा उमेदवारांनी निवडणुक लढवली आणि जिंकली तरी त्यास मागिल निवडणुकीचा खर्चाचा हिशोब न दिल्याने अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना सावधान म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबतची सविस्तर माहीती क्रमांक/ सानिआ/ नप-२०१५/ प्रक्र-१०/ का-६,महाराष्ट्र शासन राजपत्रामधे नमुद असुन, निवडणुकीमधे केलेल्या खर्चाची माहिती संबधित उमेदवाराने वेळीच सादर करणे बंधनकारक असलेचे मत व्याक्त केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…