Categories: Uncategorized

संत जगनाडे महाराज यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी-विठ्ठल क्षिरसागर

करमाळा प्रतिनिधी संत जगनाडे महाराज यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून. संत तुकाराम महाराज यांचे शिष्य म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराजाच्या गाथेमधुन समाज सुधारकाचे काम केले असून त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांनी व्यक्त केले. संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिम्मित जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की संतानी समाजातील  कुठल्या एका वर्गासाठी केले नसुन सपुंर्ण समाज कल्याणाचे कार्य केले आहे .या संतांच्या जीवनाचा अभ्यास करून आपले जीवन समृद्ध करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .आजच्या धकाधकीच्या युगामध्ये माणूस माणुसकी विसरला असून संताचे जीवन हेच खरे आपल्या जीवनाचे सार असून त्यांच्या जीवनाचे आचरण हीच खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करण्यासारखे आहे. या कार्यक्रमास पत्रकार दिनेश मडके, निलेश होनकळसे, गणेश क्षिरसागर, शंभू मेरूरकर बाबासाहेब माकुडे, प्रेम क्षिरसागर ,महावीर पोळ राजेश होनकळसे, गणेश कांबळे, राहुल कांबळे दिनेश माने, गणेश किरवे गोकुळ मडके, प्रसाद क्षिरसागर शुभम क्षिरसागर उपस्थित होते .

saptahikpawanputra

Recent Posts

जगद्गगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्यावतीने जेऊर येथे 7 जानेवारीला महारक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने 4 जानेवारी रोजी जेऊर येथे महा…

8 hours ago

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरताल महोत्सवाचे आयोजन*

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५…

3 days ago

करमाळा भाजपाकडून विविध उपक्रमांनी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी- भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी…

3 days ago

गुरु गणेश गोपालन संस्था यांच्यावतीने गुरू गणेश मिश्री ध्यान केंद्राचे उद्घघाटन गुरु महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा…

3 days ago

भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…

4 days ago