करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करमाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी करमाळा शहरामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनचे जाहीर आवाहन करमाळा शहरवासीयांना केले आहे. सध्या राज्य व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दि. 12 जुलै 2020 पर्यंत करमाळा शहरात एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. माञ 13 जुलै पासून शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत 31 बाधीत रुग्णाची नोंद झालेली असून सदरचे रुग्ण आणखी कोणाच्या संपर्कात आलेले आहे त्याची तपासणी प्रशासनाच्या वतीने युध्दपातळीवर चालू आहे. सदरचे रुग्ण विविध भागातील असल्याने करमाळा शहरामध्ये कोरोना विषाणूचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. या बाधीत रुग्णामुळे करमाळा शहरातील निम्यापेक्षा जास्त भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर झालेला आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असून सदर विषाणूची साखळी खंडीत करणे आवश्यक असल्याने दिनांक 16 जुलै ते 19 जुलै रोजी केलेल्या जनता कर्फ्युमुळे बाधीत रुग्णाचा शोध घेणे प्रशासनास साध्य झाले असून या पुढील काळामध्ये करमाळा शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी 20 जुलै ते 26 जुलै पर्यंत पुन्हा एकदा करमाळा शहरामध्ये सर्व व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी कडकडीत लॉकडाऊन पाळून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, नगरसेवक शौकत नालबंद, संजय सावंत, अतुल फंड, अल्ताफ ताबोंळी, श्रीनिवास कांबळे, प्रविण जाधव, डॉ. अविनाश घोलप, कन्हैयालाल देवी, सचिन घोलप, नगरसेविका सौ. राणी आव्हाड, सौ. भाग्यश्री किरवे, सौ. स्वाती फंड, सौ. शारदा राखुंडे, सौ. संगीता खाटेर, श्रीमती वंदना ढाळे, सौ. सीमा कुंभार, सौ. प्रमिला कांबळे, सौ. राजश्री माने यांनी प्रसिध्दी पञकाद्वारे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करुन कडकडीत लॉकडाउन पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…