करमाळा- आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्नि प्रदिपनाचे पूजन उद्या सकाळी ठीक 11 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती आज रोजी कारखाना स्थळावर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये सांगण्यात आली. या बाॅयलर अग्नि प्रदिपनाचे पूजन ह.भ.प. श्री. रामभाऊ महाराज निंबाळकर आणि ह. भ.प. श्री. विठ्ठल महाराज पाटील, शेटफळ यांच्या शुभहस्ते व श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक अविनाश वळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते होणार असल्याचे कारखान्याच्या प्रशासनाने सांगितले.
या वर्षीचा चालू गळीत हंगाम 2022-23 च्या बाॅयलर पूजनासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल आणि पाटील गटाचे नेते नारायण आबा पाटील हे उपस्थित राहतील. कारखान्यामधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या वर्षी होणारा गळीत हंगाम चांगल्याप्रकारे यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. उद्या होणा-या बाॅयलर अग्नि प्रदिपनसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ, शेतकरी, सभासद यांनी उपस्थित राहावे असे कार्यकारी संचालक श्री. अरुण बागनवर यांनी आवाहन केले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…