करमाळा प्रतिनिधी जगताप गटाने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर आजपर्यंत खूप चांगल्या क्षमतेने काम केले आहे . माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशभक्त नामदेवराव जगताप यांनी जिल्हा व तालुक्याच्या विकासासाठी संपूर्ण हयात वेचली . त्यांच्यानंतर जनतेच्या पाठींब्याने मी आजपर्यंत तालुक्याच्या विकासासाठी काम करत आहे . राजकारणाचा विचार करता तालुक्याच्या राजकारणात जगताप गट हा आ . संजयमामा शिंदे यांचे सोबत कायम राहणार आहे . परंतु वरीष्ठ पातळीवर जगताप गट भाजपाचेच काम करणार आहे . असे जगताप गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले आहे . पुढे बोलताना ते म्हणाले कि, आम्ही स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार असून आम्हाला कशाचीही अपेक्षा नाही . राजकारणात आजपर्यंत आपण भ्रष्टाचार मुक्त कारभार केला असून मी कधीही खोटे बोलत नाही व स्पष्ट वक्ता म्हणून वाटचाल करतो . माझ्या वाटचालीत मी कोणाही विरोधका सोबत षड्यंत्रे, कुरघोड्या अथवा नुकसान केले नाही त्यामुळे इतरांचे नुकसान करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही . तालुक्याच्या विकास कामासाठी अविरतपणे प्रयत्नशील होतो वआजही आ .संजयमामां सोबत तालुक्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवत आहे . एप्रिल २०१९ मधे लोकसभा निवडणुकी वेळीच मी काही तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित नसलो तरी जगताप गटाने शंभुराजे जगताप यांचे नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष ना .चंद्रकांत पाटील, आमदार राजाभाऊ राऊत , माजी खा .रणजीतसिह मोहिते पाटील, उमेदवार रणजीतसिह नाईक -निंबाळकर व अन्य नेतेमंडळीच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला व भाजपच्या विजयात खारीचा वाटा उचलला . विधानसभा निवडणुकीत मात्र मी तालुक्याचे राजकारणाचे शुद्धीकरण करून तालुका विकासाच्या योग्य मार्गावर आणणेसाठी विचारपूर्वक निर्णय घेत स्वतः थांबणेचा व संजयमामा शिंदे यांना अपक्ष लढण्यास तयार करून निवडुन आलेनंतर भाजपला पाठींबा देणेच्या अटीवरच पाठींबा दिला होता . आ .संजयमामा शिंदे यांनी देखील विजयी झालेनंतर शब्द पाळत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वप्रथम समर्थनाचे पत्र दिले . परंतु दुर्देवाने त्यावेळी भाजप सरकार आले नाही व तालुक्याच्या विकासाच्या मुद्यावर आ संजयमामानी महाविकास आघाडी सरकारला पाठींबा दिला . आ .संजयमामा शिंदे देखील मतदारसंघातील जनतेच्या विश्वासास पात्र राहत अत्यंत कार्यक्षमतेने काम करत आहेत . करमाळा तालुक्यातील आगामी आदिनाथ साखर कारखाना, जिल्हा परीषद – पंचायत समिती नगरपरीषदेसह सर्वच निवडणुका जगताप गट व शिंदे गट एकत्रच लढविणार आहोत . तालुक्याचा शाश्वत विकास, कायदा सुव्यवस्था शांतता यासाठी मी कटीबद्ध असून लोकशाही संवर्धनासाठी योग्य व पारखी नेत्तृत्वाच्या निवडीसाठी मतदारांनी पैशाला झिडकारून झाडून मतदान करावे व जनतेची सेवा करणाऱ्या योग्य नेत्तृत्वाची निवड करावी असे आवाहन देखील माजी आमदार जगताप यांनी केले .
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…