करमाळा प्रतिनिधी
आपले मानवाधिकार फाउंडेशन मार्फत सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आपल्या कार्याचा ठसा उमठवणा-या महिला रणरागिणी ”राज्यस्तरीय आपले मानवाधिकार नारीशक्ती पुरस्कार २०२२” हा करमाळा तालुक्यातील घारगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पुरस्कार म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने त्या त्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा केलेला गौरव असतो. आपण केलेल्या कर्तृत्वाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेतली गेली, याची पावती असते कार्य आणि कर्तुत्वाने माणसं मोठी होत असतात ज्ञान प्राप्त करण्यासाठी पदव्यांची गरज नसते, हे आपल्या जीवनीतून दाखवून देणाऱ्या या पुरूष प्रधान संस्कृतीत महीला म्हणुन काम करतांना ब-याच अडचणी असतात पण त्यातही तुम्ही कुठेही न डगमगता अतिशय खंबीर पणे काम करता व आमच्या सारख्या कार्यकर्तेच्या पाठीशी खंभीरपणे असता.समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आपला ध्यास कौतुकास्पद आहे.”
आपले मानव अधिकार फाउंडेशन यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा राळेगणसिद्धी तालुका पारनेर या ठिकाणी आयोजित केला होता या सोहळ्यामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी कला क्रीडा वैद्यकीय कृषी उद्योजक आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी आपले मानवाधिकार फाउंडेशन च्या वतीने आपणास राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री आण्णासाहेब हजारे, पद्यश्री श्री पोपटराव पवार आदर्श सरपंच हिवरे बाजार पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेशजी लंके साहेब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर दीपेश पष्टे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी आपली मानवाधिकार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे अनेक पुरस्कारथी व मान्यवर उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…