– करमाळा तालुक्याच्या राजकारणात मी अनेक माणसे पाहीली, अनेक नेते पाहीले परंतु आदरणीय *माजी आमदार. जयवंतरावजी जगताप साहेबांसारखा एक सहृदयी माणुस* दुसरा कोणी पाहीला नाही. आज १२ डिसेंबर रोजी आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपुर्वक शुभेच्छा !… वास्तविकतः राजकारणात वावरताना मी अनेक नेतेमंडळीबरोबर त्यांचे विविध गटात काम केलेले आहे. आजही मी आमदार. संजयमामा शिंदे यांचे गटात सक्रीय कार्यकर्ता म्हणुन सामील झालो आहे. आदरणीय आमदार मामा आणि माजी आमदार भाऊ यांची करमाळा तालुक्यात वैचारिक आणि विकासात्मक दृष्टया वाटचाल चालु असुन त्यामधे मी एक कार्यकर्ता म्हणुन कार्यरत आहे. तसे आदरणीय माजी आमदार जयवंतरावभाऊंचे आणि माझे आजही राजकारण विरहीत सोहर्यादपूर्ण संबध असुन, मी भाऊंच्या गटात नसलो तरी आमचे तालुक्याचे राजकारण आणि विकासात्मक गोष्टीबाबत नेहमी विचार विनिमय होत असतो. खरं तर आदरणीय भाऊ हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ राजकीय नेते आहेतच परंतु माझ्या नजरेतुन ते एक सहृदयी व्यक्तिमत्व आहे.. भाऊंची आणि करमाळा शहर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची नाळ अजुनही जोडलेली आहे हे नेहमीच चित्र पहायला मिळते. मी दुसऱ्या गटात, पार्टीत काम करतो म्हणुन त्यांनी मला कधीही फटकारले नाही किंवा कधीही दुर केले नाही.. ऊलट मला अनेकदा विविध कामी चांगले मार्गदर्शन केले आहे.. सन-२०१२ च्या पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळी आदरणीय भाऊंनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला केत्तुर पंचायत समिती गणातुन उमेदवारी दिली होती ही बाब मी आयुष्यभर विसरू शकत नाही.. मी अनेकदा जिल्ह्यातील, तालुक्यातील मोठमोठ्या राजकीय मंडळींशी बोलतो तेंव्हा माणुस आणि माणुसकीच्या व्याख्येत आदरणीय माजी आमदार जयवंतराव भाऊंचा नंबर सर्वात वरती असतो.. यावरूनच भाऊंच्या सहृदयी पणाची आणि माणुसकीची पोचपावती मिळते… नेहमीच थोडसं राजकारण बाजुला करून सर्वसमावेशक चर्चा होताना आदरणीय भाऊ यांचे बाबत प्रत्येकजण तोंडभरून स्तुती करताना दिसतो…
मागे कोरोनाच्या काळात देखिल आदरणीय भाऊंनी आवर्जुन मला फोन केला.. माझी माझ्या मित्रांची, कुटुंबाची आस्थेवाईक पणे चौकशी केली आणि घाबरू नका.. नियम पाळा आणि काळजी घ्या असा सल्ला दिला.. राजकारण काहीही असो पण माणुसकीची नाती जपणारा आणि कोणाचेही कधीही वाईट चिंतन न करणारा असा माणुस म्हणुन मी आदरणीय भाऊंकडे पाहतो आणि म्हणुनच मी त्यांना सहृदयी म्हणुन संबोधतो… भाऊंचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन हे नेहमी प्रेरणा देणारे असे असते.. आणि ते नेहमीच माझेसह अनेकांना प्रेरक आहे.. राजकारण असो किंवा समाजकारण अगदी हसत खेळत सर्वांशी संवाद साधणारे भाऊ ही एक वेगळी आसामी आहे. एखादा टेन्शनमधे असणारा माणुस भाऊंचे समोर गेला आणि टेन्शन फ्री होऊन आला नाही असे एकही उदाहरण आज पर्यंत नाही..
*एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा असलेले आणि राजकारणातील अनेक उच्च पदे भुषवणारे भाऊ हे एक करमाळा तालुक्याचे वैभव असुन संगोबाचा शंभुनारायण त्यांचे नेहमी पाठीशी आहे.. आई कमलाभवानी च्या आशिर्वादाने आदरणीय नेते जयवंतरावजी जगताप( भाऊ) यांना उदंड आयुष्य लाभो!.. हीच सदिच्छा!.*..*आदरणीय भाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा- ॲड. अजित सर्जेराव विघ्ने. माजी सरपंच- केत्तुर*
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…