दहिगाव उपसा सिंचन योजना – रब्बी व उन्हाळी आवर्तन आढावा बैठक संपन्न… दिनांक 5 जानेवारी पासून दहिगाव आवर्तन सुरू करण्याची शिफारस कालवा सल्लागार समितीकडे करणार- आ.संजयमामा शिंदे

प्रतिनिधी
करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक आ. संजयमामा शिंदे यांचे अध्यक्षतेखाली म्हैसगाव येथे संपन्न झाली. या बैठकीला जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री किं.वा. चौकडे , उपअभियंता पी.पी. घारे, शाखाआभियंता शा. अ. तरंगे , मेकॅनिकल विभागाचे उपअभियंता सं.प्र.पाटील , आ.बा.गोरे , स्थापत्य विभागाचे उपअभियंता अवताडे एस के, आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, प्रणित शिंदे उपस्थित होते. या बैठकीमध्ये दहीगाव उपसा सिंचन योजना टप्पा 1 व टप्पा 2 आवर्तन सुरू करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी वरती चर्चा करण्यात आली. 31 डिसेंबर 2022 पूर्वी टप्पा 1 व टप्पा 2 येथील जलविद्युत ,यांत्रिकी व स्थापत्य विभागाने आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत . 5 जानेवारी पूर्वी पंपांची ट्रायल घेण्यात यावी. 5 जानेवारी 2023 पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे व 15 डिसेंबर पासून सीना माढा बोगद्याचे आवर्तन सुरू करावे अशी शिफारस आपण कालवा सल्लागार समितीकडे करणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी यावेळी दिली.
दहीगावचे रब्बी आवर्तन 5 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत चालवले जाईल तर उन्हाळी आवर्तन 5 मार्चपासून अखेर पर्यंत चालवले जाईल अशी शिफारस आपण कालवा सल्लागार समितीकडे करणार आहोत अशी माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी यावेळी दिली. दहीगाव उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप 100% क्षमतेने कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने सर्वच विभागांनी आपापले काम वेळेत पूर्ण करावे. तसेच टप्पा 1 व टप्पा 2 या ठिकाणी कॅनॉल वरती असलेले सायफण काढून टाकावेत . टेल ला पूर्ण क्षमतेने पाणी कसे जाईल याचे नियोजन करावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी यावेळी दिल्या.

चौकट – पोटेगाव बंधारा दुरुस्तीचे काम मे 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन …
करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील पोटेगाव हा महत्त्वाचा बंधारा आहे. सदर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विस्तार सुधार या योजनेमधून 4 कोटी 15 लाख रुपये निधीचे अंदाजपत्रक तयार केलेले असून सदर बंधारे ची बंधाऱ्याची दुरुस्ती मे 2023 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून जूनच्या पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यात 100% पाणी साठवण्याची क्षमता असेल अशी माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

यशवंत शिंदे यांची नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी! ४१ व्या महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकमाढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

करमाळा प्रतिनिधी  निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…

7 hours ago

प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना पुरी (ओडिशा) येथे ‘सुकुमारी स्वरमनी’ पुरस्काराने सन्मानित

करमाळा प्रतिनिधी करमाळा  येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…

13 hours ago

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

1 day ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

6 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago