भिगवण प्रतिनिधी
दत्तकला शिक्षण संस्था संचालित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विभागाच्या नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्याचा स्वागत समारंभ मंगळवार १३/१२/२०२२ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी विभाग प्रमुख डॉ . प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थित व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी ,संस्थेच्या सचिव माया झोळ ,प्रशासकीय अधिकारी डॉ .विशाल बाबर, विभागीय संचालक डॉ . शरद कर्णे ,प्राचार्य डॉ. अप्पासो केस्ते,उपप्राचार्य श्रीकांत साळुंके यांच्यासह अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख, सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रा . रामदास झोळ म्हणाले कि,विद्यार्थांनी सर्वगुण संपंन्न होणे गरजेचे आहे व त्यावर विद्यार्थांचा विकास होत असतो . महाविद्यालयीन जीवन हे जगत असताना सर्व गोष्टींचा अनुभव घेणे गरजेचे आहे . तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ . प्रमोद पाटील बोलताना म्हणाले , विद्यार्थ्याना संशोधन, सर्वांगीण विकास याबात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच विद्यार्थ्याने प्रथम वर्ष ते चतुर्थ वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे गुण मिळवले तर पुढील आयुष्य चांगले जाते व विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात क्रांती करून नवीन बदल करावेत व विद्यार्थ्यांना विद्यापीठामधील होणारे बदल व नवीन शैक्षणिक धोरणे याबद्दल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल सावळकर , आभार प्रदर्शन प्रा .संतोष काठाळे यांनी केले .
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…