पत्रकारांना आत्मनिर्भर जीवनाची गुरुकिल्ली डिजीटल मिडिया पत्रकार संपादक संघटना आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाहीमध्ये लोक कल्याणासाठी काम करणारा पत्रकार हा महत्त्वाचा घटक असून समाजसेवेचा वसा जपणारा आहे. समाजात घडणाऱ्या घटकांचे अवलोकन करून समाजाच्या प्रगतीसाठी तो रात्रंदिवस झटत असतो. लेखणी,चित्रिकरणातून परिस्थिती मांडणारा,त्यासाठी होईल तितके श्रम देणारा,खिश्यात मोबाईल टाँकटाईम नसतांना उसने पासने पैसे घेऊन बातमी वेळेत शहरात ईमेलने पाठवणारा,जास्तीत जास्त वेळ बातमीच्या शोधात घालवणारा,बदल्यात बातमीचे चांगले कमी वाईट परिणाम भोगणारा,बातमीच्या कष्टाचा मूळ मोबदला मिळत नसतांना,केवळ पत्रकारितेशी इमान राखून उपाशी तापाशी राहून प्रसंगी स्वतःचा रोजगार,व्यवसाय बुडवून,प्रसंगी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून,घरच्यांचा विरोध पत्करून,कित्येकांशी वैर घेऊन पत्रकारिता करणाऱ्या इमानी पत्रकारांचे जीवन अत्यंत खडतर,प्रतिकूल असते.हे केवळ बोटावर मोजता येईल इतक्या जाणकार जानतात,बहुतांशी समाज व नेते,अधीकारी,यांना या पत्रकारांची धडपड फार दिसत नाही,त्यांना ती जाणून घेण्यात काही रस नसतो,केवळ “बातमी द्या,बातमी आली का?”इतका तगादा मात्र सगळे लावतात.अशावेळी राबणाऱ्या त्या पत्रकारांस नीट झोपसुद्धा मिळत नाही, घरची तोकडी परिस्थिती त्यात अधिक वेळ बातमीत घालवणारे अनेक पत्रकारांचे आयुष्य,त्यांचे कौटुंबिक जीवन यात खूप यातना असतात.अडचणी असतात. मुलांचे शिक्षण,घरातील आजारपाजार,किराणा,
लाईटबिले,घरभाडे,कर,इंधन खर्च,मोबाईल,व नेटखर्च यात त्याचे कंबरडे मोडून निघते,त्या पत्रकारांच्या अडचणीच्या बातम्या कुणिही छापत नाही,त्याला कुठली संघटना,माध्यम हातभार लावत नाही,मात्र पत्रकार अपघातग्रस्त झाला,किंवा त्याला माफिया समाजकंठक यांनी मारहाण केली,फोनवर दमदाटया दिल्या,गावात असलेला व्यवसाय धड चालत नाही,व्यवसायास जागा मिळू दिली जात नाही,सातत्याने समाजात जागृती करणारा पत्रकार प्रसंगी आजाराने ग्रस्त झाला तर त्याला प्रसंगाला कोणी हात देत नाही.ही वेळ कित्येक इमानी पत्रकारांच्या आयुष्यात आली आहे.पत्रकार नावाने मोठा त्याच्या कौटुंबिक खर्चासाठी असणाऱ्या आर्थिक चणचण त्याला असह्य वेदना समाजाला,सरकारला,त्यांच्या संघटनांना कळणार कधी?केवळ जो तो आपल्याच पोळीवर तुप ओढणारा,मात्र अडचणीत असलेल्या,अख्ख आयुष्य समाजासाठी धडपडणाऱ्या माध्यमकर्मींचे आयुष्य मात्र विवंचनेत आहे,हे अढळ सत्य अजूनही कुणीही समजून घेत नाही,हे कष्टकरी,इमानी पत्रकारांचे दुर्दैवच पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये विविध बदल व विकास घडवण्याचे काम पत्रकार आपल्या दैनिकाच्या माध्यमातून साप्ताहिकाच्या माध्यमातून करीत असतो पण सध्या प्रिंट मीडिया ला सोशल मीडियाचा म्हणजे डिजीटल मिडीयाचे दुहेरी साधन प्राप्त झाले असून सर्वात आधी बातमी देण्यासाठी सोशल मीडिया म्हणजेच डिजिटल मीडिया हे एकमेव साधन निर्माण झाले असल्यामुळे हे पोर्टल यूट्यूब चैनल फेसबुक पेज या माध्यमातून समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटनांचे वृत्तांकन करण्याची स्पर्धा वाढत आहे . या पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल मीडियाला सध्या चांगले यश मिळत असून जाहिरातीच्या माध्यमातून पत्रकारांना काही प्रमाणात अर्थाजनाची संधी निर्माण झाली असली तरी वाढती जीवघेण्या स्पर्धमुळे या पत्रकारांना कायमस्वरूपी मानधन मिळावे. डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता मिळूनअधिस्विकृती मिळवून पत्रकारांना फॅमिली पेन्शन योजना पत्रकारांसाठी पत्रकार आवास योजना अशा कल्याणकारी योजना राबवण्यासाठी व पत्रकारांचे कल्याण करण्यासाठी आमचे गुरुवर्य जेष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील एकमेव डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना स्थापन केली असून या माध्यमातून पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पत्रकारांसाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी न्याय देणारा राजा माणूस म्हणजे राजा माने साहेब आहेत. डिजिटल मीडियाला नवीन उंचीवर नेऊन पत्रकारांना राजाश्रय प्राप्त करून देण्यासाठी कार्यरत आहे ही आनंदाची बाब आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून नुसत्या बातम्यासाठी फोन करणारे पुढारी समाजसेवक समाजातील विविध घटक पत्रकार अडचणीत आल्यानंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम करतात प्रसिद्धीसाठी वारंवार फोन करणारी धन्यवाद देणारे जाहिरातीसाठी मात्र दिवसभर बातम्यांचे वृत्तांकन करण्यासाठी तहान भुकेचा विचार न करता लोक कल्याणासाठी सदैव झटणाऱ्या पत्रकारांना मात्र जाहिरातरुपी सहकार्य करण्यासही पुढारी व समाजातील मंडळी सहज टाळण्याची काम करतात हार नारळ सत्कार करून साहेब तुमचं बरं आहे असे म्हणून खोटी स्तुती करतात. पत्रकारांना कुटुंब आहे त्यांनाही उपजीविकेसाठी जाहिरातरुपी सहकार्याची गरज असते. याचा विचार समाजातील कुठलेही मंडळी करण्यास तयार नाही याचे एकमेव कारण म्हणजे पत्रकार सध्या संघटित नसल्यामुळे प्रत्येक जण मीच माझा पाठीराखा व मालक या भावनेतून काम करत असल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना मात्र संघर्ष करावा लागत आहे या देशाला समाजाला राष्ट्राला घडवण्याचे काम करणाऱ्या पत्रकाराला मात्र आपल्या उपजीविकेसाठी व कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी मात्र पूर्ण वेळ काम करूनही त्याचा मोबदला मिळत नाही ही शोकांतिका आहे याची प्रशासनाने सरकारने गांभीर्याने दखल घेऊन पत्रकारासाठी आत्मनिर्भर कल्याणकारी योजना राबवावी जे पूर्ण वेळ काम करणारे आहेत त्यांना पेन्शन योजना त्यांच्या कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सेवा मेडिकल विमा पत्रकारांसाठी स्व़ंतत्र विकास महामंडळ स्थापन करून त्या मार्फत पत्रकारांना आत्मनिर्भर करण्यासाठी मदत करावी स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणेच समाजातील विविध घटनांच्या विकासासाठी काम करणाऱ्या व देशाच्या राज्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या पत्रकारांनाही स्वातंत्र्यसैनिकाप्रमाणेच एक स्वतंत्र दर्जा देण्यात यावा. जेणेकरून पुढची पिढी समाजाच्या विकासासाठी या क्षेत्रात काम करेल. लोकशाहीचे रक्षण करून समाजविकासासाठी कार्यरत राहील हाच विचार मायबाप सरकारने करावा व पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना राजाश्रय देऊन सामाजिक हित जपण्याचे काम करावे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांनी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना काढली आहे त्या पत्रकार संघटनेमध्ये काम करणाऱ्या तसेच पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या या पत्रकारांना न्याय देण्याची काम करत करावे डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही पत्रकारांना न्याय देणारी संघटना आहे. राजा माने साहेब यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी संघटना स्थापन केली आहे. भविष्यामध्ये नक्कीच इतिहासात त्याची नोंद होणार असून समाज हितासाठी काम करणारे राजा माने साहेब हे नक्कीच पत्रकांरासाठी आधारवड क्रांतीदुत आहे. डिजिटल पत्रकार संघटनेला सरकारने मान्यता देऊन एक स्वंतत्र पत्रकार आर्थिक विकास महामंडळ तयार करून पत्रकारांसाठी काम करणाऱ्या या संघटनेला सहकार्य करून पत्रकारांना न्याय द्यावा हीच या सरकारकडुन अपेक्षा आहे. दिनेश उध्दवराव मडके पत्रकार संपादक साप्ताहिक पवनपुत्र तालुकाध्यक्ष करमाळा डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना मो.नं.9272993941
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…