करमाळा प्रतिनिधी टेंभुर्णी ते जातेगाव हा महामार्ग क्रमांक 561 ए चा टप्पा राज्यशासनाकडेच होता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित होऊन सुद्धा केंद्राकडे हस्तांतरित झालेला नव्हता हा मार्ग सुप्रीम कंपनीकडे ताब्यात असल्यामुळे याचे हस्तांतरण होऊ शकत नव्हते अनेक वर्ष सुप्रीम कंपनी कोर्टामध्ये दावे दाखल करून अडथळे निर्माण करत होती त्यामुळे महाराष्ट्र शासन नहारक प्रमाणपत्र ही देऊ शकत नव्हते बऱ्याच प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने अखेर ना हरकत प्रमाणपत्र दिले व त्याचे त्याचे श्रेय घेण्याची चढाओढ तालुक्यातील नेते मंडळी मध्ये लागलेली होती हे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे म्हणजे सर्वकाही अलबेल झाले असे लोकांनाही वाटू लागले परंतु हस्तरांतराची प्रक्रिया त्यापेक्षा फारच किचकट होती त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते अकलूज येथील तेलंग साहेब यांचे कडून हस्तांतराचा रीतसर प्रस्ताव जाणे आवश्यक होते तसेच राष्ट्रीय महामार्ग सोलापूर कार्यालयाकडून ही हस्तांतराच्या प्रस्ताव केंद्र शासनाच्या कार्यालयाकडे जाणे आवश्यक होते या दोन्ही कार्यालयाकडे मी स्वतः दूरध्वनी वरून संपर्क करून तसे प्रस्ताव पाठवण्याची विनंती केली त्याप्रमाणे दोन्ही कार्यालयाकडून प्रस्ताव गेल्यानंतर महामार्ग कार्यालयाच्या दिल्ली स्थित माननीय खोडसकर साहेब ज्यांच्याकडे हा प्रस्ताव गेला होता त्यांच्याशी सतत पाठपुरावा करून तो प्रस्ताव त्यांनी पुढील कारवाईसाठी माननीय श्री सुदीप चौधरीसाहेब यांचे कडे पाठविला गेला व त्यांनी तो प्रस्ताव गेल्या दहा दिवसांपूर्वी माननीय नितीन गडकरी साहेब यांचेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता गेल्या दोन दिवसांपूर्वी माननीय गडकरी साहेब यांनी सदर प्रस्तावावर विमान प्रवासामध्ये स्वाक्षरी केली व तशी माहिती त्यांचे कार्यालयाने महामार्ग कार्यालयातील सोलापूर विभागाचे माननीय चिटणीस साहेब यांना कळविली त्यामुळे सदरचा टेंभुर्णी ते जातेगाव हा महामार्गाचा टप्पा आता केंद्र शासनाच्या गॅझेटमध्ये त्याचे प्रसिद्धीकरण होईल व सदर महामार्गाचे पुढील काम केंद्र शासनाकडून सुरू होईल सदर हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी महामार्ग कार्यालयाचे सोलापूर विभागाचे प्रमुख माननीय श्री चिटणीस साहेब यांनी फाईल कोणकोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती वेळोवेळी दिल्यामुळे सदर फाईलचा पाठपुरावा करणे सुलभ झाले माननीय चिटणीस साहेब यांनी यापूर्वीच या टप्प्याचे कामकाज सुरू करण्यासाठी पुणे येथील मोनार्च कंपनीला योग्य त्या सूचना दिलेल्याच आहेत अशीही माहिती त्यांनी सांगितली आहे त्यामुळे आता या महामार्गाच्या टप्प्याचे भूसंपादनाचे व पुढील सर्व कामकाज मार्गी लागल्यात जमा आहे भूसंपादनाचे मोजणी व हद्दीखूनाचे कामकाज यापूर्वीच 2018 साली 80 टक्के पूर्ण झालेले आहे उर्वरित 20 टक्के कामकाज लवकरात लवकर पूर्ण होऊन पुढील कामकाजाच्या टेंडरची प्रक्रिया ही लवकरच सुरू होऊ शकेल त्यामुळे नगर ते टेंभुर्णी हा संपूर्ण रस्ता चार पदरी पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल करमाळा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत मोलाचे ठरणार आहे या रस्त्याच्या हस्तांतरण प्रकरणी अनेकांनी प्रयत्न केलेले असतील त्यांचेही मी आभार मानतो वस्तुतः या महामार्गाच्या भूसंपादनामध्ये माझ्या जिजाऊ बंगल्याच्या कंपाउंड बरोबरच सुमारे 55 चौरस फूट खुली जागा संपादित होत आहे तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून मी हा महामार्ग पूर्ण व्हावा म्हणून प्रयत्न करीत होतो व करीत राहणार आहे या रस्त्याचे कामकाज पूर्ण होणे कामी ज्यांना श्रेय घ्यायचे असेल त्यांनी खुशाल घ्यावे मी एक सामान्य परंतू कर्तव्यदक्ष नागरीक या भावनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे व सर्वांच्या आशीर्वादाने व सदिच्छाने माझ्या प्रयत्नाला यश मिळत आहे अर्थात महामार्ग कार्यालयाच्या अनेक अधिकाऱ्यांनी या कामी मला मार्गदर्शन व मदत केलेली आहे हे मी आवर्जून उल्लेख करत आहे व त्यांचे ऋण व्यक्त करीत आहे
गुलाबराव बागल करमाळा
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…