शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय व उद्योगात उतरण्याची गरज:-भालचंद्र पाठक

 

शेटफळ प्रतिनिधी
सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय व उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध आहेत धाडस व कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यशस्वी होऊ शकतात आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मुलांनी विविध क्षेत्रातील माहिती घेऊन वेगवेगळ्या उद्योग व व्यवसायात धाडसाने उतरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत संघटक भालचंद्र पाठक यांनी शेटफळ तालुका करमाळा येथे नागराज ठिबक कंपनी शुभारंभ व दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल पाटील महाराज व ॲड बाबुराव हिरडे उपस्थित होते. पुढे बोलताना पाठक म्हणाले की शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विषमुक्त शेती पिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.शेती करणे दिवसोंदिवस अवघड होत चालले आहे आता शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीबरोबरच पुरक व्यवसाय उद्योग सुरू करणे ही काळाची गरज आहे संदर्भात शेटफळ येथील तरूणांचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घेण्याची गरज आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी शेतकऱ्यांपुढील विविध समस्येसाठी शेतकऱ्यांनीच उत्तरे शोध दिली पाहिजेत आणि संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. लोकविकास डेअरीचे दीपक आबा देशमुख यांनी शेतकऱ्यांची जी मुले नवीन व्यवसाय उद्योग करू इच्छित आहेत त्यांना वडीलांनी व सर्व घरातील मंडळींनी प्रोत्साहन देऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी शेटफळ येथील तरुणांनी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र येऊन विविध व्यवसाय उद्योग व्यवसाय उभारत आहेत याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना होत असून तालुक्यातील इतर गावातील तरुणांनी याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले अध्यक्ष स्थानावरून बोलताना भालचंद्र पाठक सर यांनी शेती पिकवताना शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून विषमुक्त शेती पिकवण्याचा ध्यास घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार वैभव पोळ यांनी मानले या कार्यक्रमाला ॲड बाबुराव हिरडे,सरपंच विकास गुंड, विठ्ठल पाटील महाराज, सनदी लेखपाल विकास वाघे , केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल पाटील लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख महेंद्र पाटील पत्रकार अशोक मुरूमकर मकाईचे माजी संचालक किरण पोळ, आदिनाथचे माजी संचालक सुरेश पोळ, कैलास लबडे विलास लबडे नानासाहेब साळुंखे प्रशांत नाईकनवरे विष्णू पोळ राजेंद्र साबळे विजय लबडे यांच्यासह या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago