Categories: करमाळा

कार्यकर्त्यांना आधार देणारा आणि योग्य दिशा दाखविणारा नेता म्हणजे आमदार संजयमामा शिंदे – ॲड अजित विघ्ने

*
करमाळा प्रतिनिधी आमदार. संजयमामा शिंदे हे कार्यकर्त्यांना खुष करणारे आमदार आहेत अशा प्रकारचे वक्तव्य पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि माजी. आमदार नारायण आबा पाटील गटाचे नेते श्री. दत्तात्रय सरडे यांनी केले असुन, याबाबत आमदार. संजयमामा शिंदे गटाचे पश्चिम भागातील युवक नेते ॲड. अजित विघ्ने यांना विचारले असता या वक्तव्या बाबत त्यांनी मत मांडले की, श्री. दत्ता सरडे यांचे म्हणणे उपरोधिक असले तरी आमदार संजयमामा शिंदे हे कार्यकर्त्यांची काळजी घेतात हे सत्य मात्र त्यांनी त्यांच्याच तोंडुन सांगितले आहे.. जे खरेच आहे.. वस्तुतः राजकारणात कोणत्याही नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांना कायम सांभाळावे लागते… आणि निश्चितपणे आज कार्यकर्त्याचे हीत लक्षात घेऊन आमदार. संगयमामा शिंदे कार्यरत असुन, विविध उदयोगधंदे, कॉन्ट्रक्टर , व्यापार याचे माध्यमातुन आमदार संजयमांमानी कार्यकर्ते सांभाळले आहेत.. दत्ता सरडेंनी त्यांचे वाढदिवसाचे दिवशी केलेले वक्तव्य नक्कीच उपरोधिक असले तरी मामा कार्यकर्त्यांना सांभाळतात हे सत्य आहे.. अशी प्रतिक्रिया ॲॅड. अजित विघ्ने यांनी दिली.. तसेच घरतवाडी ग्रामस्थांचे मागणी प्रमाणे शासन स्तरावर पाठपुरावा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार. संजयमामा शिंदे प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.. वस्तुतः या गावासाठी आमदार. संजयमामांनी विविध सुविधांकरीता निधी दिलेला आसुन रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी दिला आहे, परंतु डांबरीकरणच व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी असुन, याबाबतचा देखिल पाठपुरावा चालु आहे.. घरतवाडीच्या रस्त्यासह करमाळा तालुक्यातील काही महत्वाचे रस्त्यांबाबत आमदार . संजयमामा शिंदे यांची आग्रही मागणी असलेबाबतची देखिल माहीती अँड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

  करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…

2 days ago

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

3 days ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

4 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

4 days ago