ओटीएस मधे सहभागी शेतकर्‍यांना डीसीसी देणार तिसऱ्या दिवशी कर्ज : कुंदन भोळे : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मागणीची घेतली दखल

करमाळा प्रतिनिधी ओटीएस च्या नियमांतर्गत ज्यादिवशी शंभर टक्के रक्कम बँकेकडे जमा केली जाईल त्यादिवशी शेतकर्‍याचे क्षेत्र, पिक, पिककर्जाच्या दुप्पट रकमेचा इकरार बोजा नोंदीचा सातबारा आदी बाबींची पूर्तता होताच तिसऱ्या दिवशी शेतकर्‍याचा कर्जरोखा करण्याचा स्तुत्य निर्णय सोलापूर जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष कुंदन भोळे यांनी घेतला आहे . याबाबत बँकेचे माजी व्हा . चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी श्री भोळे यांनी पदभार घेताच लेखी निवेदनाव्दारे व दुरध्वनीवरून संपर्क साधत मागणी केली होती . जगताप यांनी दिलेल्या लेखी निवेदनात ओटीएस (एकरकमी परतफेड योजना ) मधे सहभागी थकबाकीदार शेतकर्‍यांना पुन्हा नव्याने कर्जवाटप होत नसल्याने याचा बँकेची थकबाकी वसुलीवर होत असलेला परिणाम व पर्यायाने सदरचे शेतकरी हे राष्ट्रीयीकृत बँकेकडे तसेच खाजगी सावकारीकडे वळत असले बाबत लक्ष वेधले होते . त्यामुळे ओटीएस ची प्रभावी अंमलबजावणी व सहभागी शेतकर्‍यांना सोसायटी मार्फत कर्जवाटप करणेची मागणी केली होती . जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेताच माजी आमदार जगताप यांनी केलेली मागणी व शेतकरी तसेच बँकेच्या हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णया बाबत जिल्हाभरातून सर्वत्र स्वागत केले जात आहे . _याबरोबरच माजी आमदार जगताप यांनी जिल्हा बँक व सोसायटी यांच्यामधील कर्जवाटप तसेच वसुलीसाठी महत्वाचा दुवा म्हणून काम करीत असलेल्या गटसचिवांच्या थकीत व नियमीत पगारी बाबत निर्णय घेणेविषयी मागणी केली असून याबाबत देखील सकारात्मक असल्याचे श्री .भोळे यांनी सांगितले_ .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

19 hours ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago