नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. देशात स्वायत्त महाविद्यालये आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावेत, हा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला होता. यापूर्वी एकावेळी एकाच विद्यापीठाची पदवी आपण घेऊ शकत होतो, मात्र आता एकाच वेळी सहा विद्यापीठांची पदवी आपण घेऊ शकतो, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, महाराष्ट्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आग्रह धरला कि, हळूहळू स्वायत्त महाविद्यालय आणि स्वायत्त विद्यापीठ तयार व्हावीत कि ज्यामुळे अभ्यासक्रमातील म्हणजे एकच अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे शिकवले जातात हा जो भाग आहे त्यामध्ये प्रयोगांना परवानगी देण्यात आली. ज्यामध्ये आता १२ वी नंतर तीन वर्षाची डिग्री आता चार वर्षांची करण्यात आली आहे. ज्यामध्ये मल्टी एंन्ट्री आणि मल्टी एक्सिट ठेवली आहे. यामध्ये दोन वर्ष तुम्ही अभ्यासक्रम थांबवून काही वर्षांच्या गॅप नंतर पुन्हा अभ्यासक्रम जॉईन करू शकता. दोन वर्षांमध्ये तुम्ही जो कोर्स पूर्ण केला त्याचे क्रेडिट तुमच्या डिजिटल लॉकरमध्ये जमा होतात. आता जगातल्या सगळ्या विद्यापीठांचा एमओयू पूर्ण होत आला. ज्याच्या आधारावर आपल्या देशात दोन वर्ष पूर्ण केलेले क्रेडिट घेऊन परदेशातल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकता. तुम्ही तिथे पुढचं शिक्षण घेऊ शकता, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
एका वेळेला आपण एकाच विद्यापीठाची पदवी घेऊ शकत होतो, आता एका वेळेला तुम्ही सहा सहा विद्यापीठांच्या पदव्या घेऊ शकता. आता ग्रॅज्युएशन नंतर पण पीएचडी करू शकता अशी शिक्षणामध्ये एका अर्थाने सुकरता आणण्याचा जो प्रयत्न सुरु आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवजवळ १४० कॉलेजेसना स्वायत्त महाविद्यालय म्हणून आपण परवानगी दिली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…